पाटणबोरी येथे वैराग्यमुर्ती राष्ट्रसंत श्री गाडगेबाबांचा जयंती महोत्सव संपन्न.

0
31

पाटणबोरी येथे वैराग्यमुर्ती राष्ट्रसंत श्री गाडगेबाबांचा जयंती महोत्सव संपन्न.

 समाजभूषण मान्यवर सन्मानित…..

राजु तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.

पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथे वैराग्यमुर्ती राष्ट्रसंत श्री. संत गाडगे महाराजांची 149 वी जयंती विविध कार्यक्राम घेवून निमित्त मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

श्री संत गाडगेबाबानी दिलेला मुल मंत्र स्वच्छतेचा संदेश अनुसार सर्वप्रथम ग्राम स्व्छता अभियान राबवून गाव स्वच्छ करण्यात आले. गाडगे महाराजांची प्रतिमा सजवून महिला व पुरुष भजन मंडळीच्या सहाय्याने शहरातील मुख्यमार्गाने भव्य शोभा काढण्यात आली.गाडगे महाराजांची केलेली वेशभुषा सर्वांचे लक्ष वेधुन घेत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी निखिल शहाकर , प्रमुख पाहुण्या म्हणुन पाटणबोरी च्या प्रथम नागरिक दिपालीताई सुरावार,उपसरपंच विजयाताई मंदूलवार, विलास वाघमारे सर , केमेकर सर,भाजपा शहर अध्यक्ष गजानन सिंगेवार,गजानन पानाजवार, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी सरपंच त्र्यंबक नगराळे, सत्यविजय करमनकर, हे प्रामुख्याने उपस्थित होते.
समाजातील व पांढरकवडा तालुक्यातील उत्कृष्ट पत्रकार रवी दर्शनवार यांना उत्कृष्ट पत्रकार, झरिजामनी येथील पुरवठा अधिकारी मेघा पारथकर यांना पुरस्कार देण्यात आला तसेच राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत सुवर्ण पदक व रेस स्पर्धेत कास्य पदक संपादन केलेल्या ची.विराज शहाकार ह्याला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देण्यात आले.

शहरातील प्रथम नागरिक दिपाली सुरावार, उपसरपंच विमल मंदूलवार, उगेवार ताई ढोकी, मनोज भाऊ यांना उपस्थित मान्यवरांचे हस्ते समाज बांधवा तर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.अध्यक्षीय भाषणा मध्ये निखिल शहाकर सर यांनी श्री संत गाडगे महारांची जिवन शैली कशा पद्धतिची होती त्यांनी कशा प्रकारे समाज प्रबोधनाचे कार्य अविरत सुरु ठेवले यासंदर्भात माहिती दिली.

याप्रसंगी कू.प्रवलिका पत्रकार, चि.आनविक कात्रजवार, कु.दिक्षा भोंग यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन पत्रकार यांनी केले.यावेळी परिसरातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्या करीता सर्व भाषिक धोबी, वरठी,परीठ समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here