सत्यपाल महाराजांच्या हस्ते जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचारी पतसंस्था आर्णी च्या वणी शाखा कार्यालयाचे उद्घाटन.

0
166

सत्यपाल महाराजांच्या हस्ते जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचारी पतसंस्था आर्णी च्या वणी शाखा कार्यालयाचे उद्घाटन.

गुणवंत पचारे यांच्या प्रयत्नातून वणी शहरात शाखेचा शुभारंभ.

राजु तुरणकर – संपादक.

राम शेवाळकर परिसर वणी येथे जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था र न १६५१ म. आर्णी शाखा वणी च्या नविन कार्यालयाचे उद्घाटन सप्त खंजेरी वादक, प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे शुभहस्ते तर पतसंस्थेचे अध्यक्ष राजुदास जाधव यांच्या मार्गदर्शनात दिनांक २४\२\२०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता करण्यात आले.

सत्यपाल महाराजांचा संस्थेच्या वतीने शाॅल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.महाराजांच्या हस्ते विद्यार्थी प्रिय शिक्षक  ईश्वर राऊत यांचा बुद्धिबळ स्पर्धेत कर्मचारी क्रिडा स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावल्या बद्दल तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी खो खो क्रिडा स्पर्धेत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकासह वैयक्तिक स्पर्धेत प्राविण्य मिळविल्याने सत्कार करण्यात आला.

संस्थेच्या वतीने महाराजांचे आवडते शिष्य गुणवंत पचारे सर यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांनी संस्थेला कमी किंमतीत ब्लॉक उपलब्ध करुन दिले, टेबल, खुर्च्या ,फोटो इ.भेट म्हणून दिले.

याप्रसंगी सल्लागार संचालक शरद इंगळे , मधुभाऊ कोडापे, गुणवंत पचारे, राम बदकी,विनोद पुनवटकर ,रविंद्र गायकवाड, विनोद सुके,विनोद खारकर, उत्तम कोवे, विजय माळीकर, प्रविण वैद्य, ईश्वर राऊत, नरेंद्र ढेंगळे, संस्थेचे व्यवस्थापक श्रेयस सुर, कर्मचारी निलेश कोंगरे उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here