सावर्ला येथिल घरकुल लाभार्त्यांना रेती उपलब्ध करून द्या – प्रवीण खानझोडे.
राजु तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.
सार्वला येथील घरकुल लाभार्थ्यांना नोव्हेंबर २०२४ मधे महाराष्ट्र शासनाच्या वतीने वणी पंचायत समितीच्या माध्यमातून घरकुल मंजूर होऊन त्याचा १५००० रुपयाचा पहिला हफ्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला व त्यानुसार त्यांनी राहते घर उकलून घरकुल बांधायच असल्याने तात्पुरती राहायची व्यवस्था केली. मात्र फक्त रेतीअभावी घरकुल लाभार्थी आज उघद्यावर आले आहे त्यामुले तहसीलदार वणी यांना सार्वला येथिल घरकुल लाभार्थी ने रेती उपलब्ध करून देन्याची मागनी प्रवीण खानझोडे लढा संघटना चे संयोजक वणी यांनी केली आहे.
यावेळी सार्वला येथील गावातील लाभार्थी पांडुरंग आवगाण, श्रीराम चिव्हाने, कर्नू नैताम, शंकर बावणे, विकास चौधरी, जंगलू नैताम, सुनीता ठमके, संतोष मडावी संजीवनी मुन, प्रताप मुन, उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेंडे उपस्थित होते.