वणी येथे १ मार्चला नाभिक समाजाचा उपवर – वधु परिचय मेळावा.
समाजातील मान्यवर समाज भूषण पुरस्काराने होणार सन्मानित.
राजु तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.
महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्हा शाखा – वणी व्दारा आयोजित उपवधु-वर परीचय सोहळा व राज्य स्तरीय नाभिक समाज मेळावा शनिवार, दि. ०१ मार्च २०२५ ला दुपारी १२.०० वाजता शेतकरी मंदिर, वणी, जि. यवतमाळ आयोजित करण्यात आला आहे.
या वधू-वर परिचय मेळाव्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम समाज भुषण, समाज गौरव, विशेष गौरव सम्मान, समाज विचार मंथन अशा विविध सामाजिक दायित्व असलेल्या कार्याची कार्यक्रमात रेलचेल असणार आहे.
नाभिक समाजातील माननीय बंधु भगिनींनो, समाज मेळाव्यास सहपरिवारासह आपल्या उपवर- वधूंसह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी . असे आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष शशिकांत उर्फ डुड्डू नक्षीने , यांच्यासह येथील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान केली आहे.