अखंड स्वच्छतेचा जागर, अष्टमीच्या पहाटे जैताई मातेच्या प्रांगणात स्वच्छता अभियान.
नगर सेवा समितीचे १२ वर्षापासून दर रविवारी स्वच्छ्ता अभियान.
राजू तूरणकर_ वणी
निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी दिलेल्या स्वच्छ्तेच्या मूलमंत्रा ला अनुसरून वणीतील नगर सेवा समिती मागील बारा वर्षांपासून दर रविवारी पहाटे पाच वाजता बाळासाहेब ठाकरे स्मारक, साई बाबा मंदिर ते जैताई मंदिर परिसरातील नित्य नेमाने स्वच्छ्ता करीत असते. आज रविवार आणी नवरात्र उत्सवातील अष्टमी हा योग जुळून आल्याने जैताई मंदिरातील संपूर्ण परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला.
सन 2011ला सागर मुने यांनी नांदेपेरा रोडवर असलेल्या धुळीमुळे त्रस्त होऊन हातात खराटा घेऊन रोडवरील धूळ रोज सकाळी झाडायला सुरुवात केली, त्याला साथ देत नगर सेवा समितीने या उपक्रमाला मग व्यापक स्वरूप देण्यात आले, सलग दोन वर्षे हा नांदेपेरा रोड ते बस स्टॉप इतका परिसर दर रविवारी पहाटे अखंडित पने झाडू जावू लागला.
कोरोणा काळा पासून बाळासाहेब ठाकरे स्मारक, साईबाबा मंदिर व जैताई मंदिर परिसरात स्वच्छ्ता अभियान राविण्यात येत आहे.
आज नवरात्र उत्सवातील अष्टमी आणी रविवार असा दुग्धशर्करा योग जुळून आल्याने नगर सेवा स्वच्छ्ता समितीच्या वतीने विशेष अभियान राबविण्यात आले. व वणी शहराचे आराध्यदैवत असलेल्या जैताई मातेचा परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला.
यावेळी नगर सेवा स्वच्छ्ता समितीचे अध्यक्ष माजी सैनिक नामदेवराव शेलवडे, माजी मुख्याध्यापक दिनकरराव ढवस, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख राजू तुरानकर, सागर मुने, प्रदीप मुके, नितीन बिहारी व भास्कर पत्रकार उपस्थित होते.