वर्षातुन 180 दिवस पाणी पुरवठा कर 365 दिवसांचा वरून दंड आणि व्याज युवासेनेचा वणी नगर परिषद मुख्याधिकारी यांना असहकार आंदोलनाचा इशारा..
मालमता व पाणी करावर लावण्यांत आलेल्या व्याजाची रक्कम माफ करणे संदर्भाने सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या युवासेनेच्या निवेदनाची गांभीर्याने दखल न घेतल्याने युवासेना आक्रमक.
राजु तुरणकर – संपादक.
युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या मार्फत. दिनांक २९ मे २०२३, ९ ऑक्टो २०२३ व १० जानेवारी २०२५ ला
नगरपरिषद प्रशासनामार्फत नागरिकांना होणारा पाणीपुरवठा या अनुषंगाने तक्रारी करण्यात आल्या. कित्येक वर्षापासून वणीकर जनतेला तीन दिवसा आड पाणी पुरवठा सुरु आहे. मात्र वणीकर जनतेकडून 365 वार्षिक दिवसांचा कर वसूल केल्या जात आहे. तसेच संपूर्ण वणीकर नागरिक पिण्याचे पाणी विकत घेऊन पित असल्याचे आवगत केले होते. परंतु नगर परिषद मुख्याधिकारी यांनी या निवेदनाला गांभीयाने घेतले नाही व निवेदनकर्त्यांना बोलावून चर्चा करण्याचे दिलेले आश्वासन सुद्धा पाळले त्यामुळे युवा सेना आक्रमक होऊन अखेर कर न भरण्याचा असहकार आंदोलनाचा अनुषंगाने मुख्याध्यापक मुख्याधिकारी नगरपरिषद वणी यांना युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
वणी न.प हद्दीतील मालमता व पाणी कर मालमत्ता धारकाकडून कर वसूल करण्यात येते. संभवतः मालमता व पाणीकर धारकांनी काही अपरिहार्य कारणास्तव तसेच आर्थिक अडचणीमुळे कराची रक्कम वेळेत भरणा केली नाही. परंतु भरमसाठ रक्कम व्याजाचे स्वरूपात वसूल करण्यात येत असल्याने शिवसेनेच्या शिष्ट मंडळाला ती रक्कम माफ करण्याचे अनुषंगाने चर्चा करुण सोडविण्याची आश्वासन मुख्याधिकारी नगरपरिषद यांनी दिले होते. मुख्याधिकारी नगरपरिषद हे कार्यालयाच्या बाहेर निघून शहरात फिरुन कधीही शहरातील समस्यांची सोडवणूक करताना दिसत नाही.
कराचे स्वरूपात आकारण्यात येत असलेली व्याजाची रक्कम माफ करून वरील कर मुद्दल स्वरुपात आकारण्यात यावी जेवढे दिवस पाणी पुरवठा केला जातो तेवढेच दिवसाची कर आकारणी करावी. तसे न केल्यास या विरोधात युवासेनेकडून तिव्रस्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येणार असल्याचे निवेदन युवासेनेच्या वतीने देण्यात आले.