वणी तालुका तिरळे कुणबी समाजाची कार्यकारिणी गठीत. अध्यक्षपदी आशिष काळे, उपाध्यक्षपदी राजु देवडे तर सचिव पदी अशोक चौधरी.
राजु तुरणकर – संपादक.
तिरळे कुणबी समाज संघटना तालुका वणीची नूतन कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली. पदाधिकाऱ्यांची निवड शहरातील कान्हा भोजनालय येथे पार पडलेल्या सहविचार सभेत करण्यात आली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी वैद्यकीय ता. अधिकारी डॉ शांताराम ठाकरे उपस्थित होते. प्रमुख पाहूणे म्हणून ज्येष्ठ समाजसेविका नीलिमाताई काळे, राजु देवडे उपस्थित होते.
या सभेत नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली त्यात अध्यक्ष आशिष काळे, सचिव अशोक चौधरी, उपाध्यक्ष राजू देवडे, सहसचिव वैशाली तावडे, कोषाध्यक्ष राहुल इंगोले, तर सदस्य म्हणून संतोष भेले, वैजनाथ खडसे, मनिष चौधरी, सचिन पोहेकर, सचिन ठाकरे, कार्तिक देवडे, सुमित्रा गोडे, वैशाली वातीले, सविता रासेकर, प्रसाद ठाकरे, मनोज चौधरी व प्रसिध्दी प्रमुख प्रशांत गोमकर यांची सर्वानुमते कार्यकारिणीमध्ये निवड करण्यात आली.
यामुळे तिरळे कुणबी समाज संघटनेच्या कामकाजाला गती मिळेल व नव्या जोमाने सामाजिक उपक्रमाला प्रारंभ होणार आहे. या सहविचार सभेचे सूत्रसंचालन ग्रामगीताचार्य वैजनाथ खडसे यांनी केले. या सभेला मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते..