कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा शेतकरी विरोधी वक्तव्याचा वणी विधानसभा शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध.
आमदार संजय देरकर व जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात तीव्र निदर्शने… मंत्रिमंडळातून कृषिमंत्र्यांच्या हकलपट्टीची मागणी.
राजु तुरणकर
महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी विरोधी केलेल्या वक्तव्याचा वणीत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वतीने उपविभागीय कार्यालय वणी येथे निदर्शने देत निवेदन देवून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
एका शेतकऱ्याने कर्जमाफीबद्दल कोकाटे यांना विचारले होते.अजितदादा म्हणत आहेत, कर्जमाफी होणार नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्यांची तर कर्जमाफी होईल का? असा प्रश्न या शेतकऱ्याने केला होता. शेतकऱ्याच्या याच प्रश्नाचे उत्तर देताना, कर्ज घ्यायचं आणि पुढचे पाच-दहा वर्षे कर्जमाफी होण्याची वाट पाहायची. जोपर्यंत कर्ज माफ होत नाही, तोपर्यंत वाट पाहायची, असं शेतकरी करतात. कर्जमाफीतून मिळालेल्या पैशांचं तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीत एका रुपयांची तरी गुंतवणूक आहे का? असा सवाल कोकाटे यांनी केला होता. शेतकरी म्हणतात की, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा, असेही ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, अशा या शेतकरी विरोधी कृषी मंत्राचा वणी विधानसभेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला असून, मुख्यमंत्र्यांनी यांचा तात्काळ राजीनामा घेऊन यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वणी विधानसभा गटाच्या वतीने आमदार संजय देरकर व जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना वणीचे उपविभागीय अधिकारी कार्यालय वणी यांच्यामार्फत निवेदन देऊन करण्यात आला. यावेळी शिवसेना वणी विधानसभा सह. संपर्कप्रमुख संतोष माहूरे, डिमन ताई टोंगे,सुधीर थेरे, राजू तुराणकर, मनोज ढेंगळे, प्रशांत पाच भाई, पुरुषोत्तम बुट्टे, प्रकाश कऱ्हाड, अजय चन्ने, दुष्यंत उपरे, विनोद उप्परवार, अशोक पंधरे, संतोष कुचनकर, विनोद ढुमणे, मनीष बत्रा, बंडू टोंगे, भगवान मोहिते, संजय देठे, जगन जुनघरी, राजू गोलाईत, सचिन पाटील, दिलीप ताजणे,अजय कौरासे, राजू पारधी, विवेक ठाकरे, विद्याधर भोयर इत्यादी शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.