प्रवीण खानझोडे यांना पितृशोक.नत्थुजी खानझोडे यांचे निधन..
लोकवाणी जागर वृतांक
राजूर कॉलरीतील सुपरिचित व्यक्तिमत्व नत्थूजी बापूराव खानझोडे यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक 18 एप्रिलला दुपारी 4.00 च्या सुमारास निधन झाले.
सामाजिक कार्यकर्ते प्रवीण खानझोडे यांचे ते वडील होते. काही दिवसांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयातील उपचारानंतर त्यांना आठ दिवसांपूर्वी घरी आणण्यात आले होते.
त्यांच्या पार्थिवावर रविवार दिनांक २० एप्रिलला सकाळी ११ वाजता राजूर कॉलरी येथे अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात पश्चात ३ मुलं, सुना, नातवंडं असा बराच मोठा आप्त परिवार आहे. मनमिळावू आणि मृदूभाषी अशी त्यांची फार मोठी ओळख होती. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. लोकवाणी जागर परिवाराच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली.