नायगाव शेत शिवारात आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह.

0
443

नायगाव शेत शिवारात आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह.

परिसरात दहशत ,  विविध चर्चेला उधाण 

लोकवाणी जागर वृतांक 

वणी वरोरा रोडवरील सुशगंगा पॉलिटेक्निक कॉलेज जवळ नायगाव शेतशिवरात  दिनांक १८ एप्रिल रोजी काल सायंकाळी पाच वाजता अनोळखी इसमाचा मृतदेह संदेह परिस्थितीत आढळून आला आहे , सदर घटनेची माहिती वणी पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाची पाहणी करून मृतदेह ताब्यात घेत ग्रामीण रुग्णालय वणी येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

मृतदेहाची ओळख होईल अशी कोणतेही शरीरावर खून अथवा कागदपत्रे आढळुन आले नाही. त्यामुळे सदर इसमाची ओळख पटली नसुन यांना कोणी ओळखत असेल तर त्यांनी वणी पोलिसांना माहिती द्यावी, व ९७६३३०४७८१ या मोबाईल नंबर संपर्क साधावा असे आवाहन वणी पोलिसांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here