पहलगाम घटनेच्या युवा सेनेच्या वतीने निषेध.    

0
80

पहलगाम घटनेच्या युवा सेनेच्या वतीने निषेध.    

पाकिस्तानी झेंडा जाळून केली तीव्र निदर्शने.

लोकवाणी जागर वृत 

संपूर्ण मानवजातीला कलंकित करणाऱ्या पहलगाम घटनेचा पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा वणी युवासेनेच्या वतीने युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज परिसर (शिवतीर्थ येथे) दहशतवाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद अशा  घोषणा देण्यात आल्या तर पाकिस्तानच्या झेंड्याला चप्पल मारीत व दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानचा झेंडे जाळून प्रतीकात्मक तिरडी आंदोलन करत तीव्र निदर्शने करण्यात आले.

यावेळी सबिर शेख, कुंदन पेंदोर,मनोज वाकटी, गौरव पांडे, मिलिंद बावणे, आशुतोष नागबिडकर, विनोद दुमणे, धनराज येसेकर, आकाश तमिलवार, संदीप बावणे,शुभम नागपुरे, मयूर खांडरे, राजू चिंचोलकर, सचिन कळमनकर, आकाश पेंदोर,अनिकेत बदकल,अभिषेक गुंडावार, बादल येसेकर, आर्या राऊत, संघर्ष शेंडे बबन केळकर, मोठ्या प्रमाणात युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here