वणी बसस्थानकावर सरबत वाटप…
योग वेदांत समितीचा संत आसाराम बापूंच्या अवतरण दिनानिमित्त उपक्रम.
लोक वाणी जागर
संत आसाराम बापू यांच्या अवतरण दिनानिमित्त वणी बसस्थानकावर शरबत व थंड पाण्याचे वितरण करण्यात आले.
संत श्री आसाराम बापू यांच्या 89 व्या जन्मदिनाच्या निमित्ताने वणी आगर प्रमुख लता मुळेकर यांच्या उपस्थितीत वणी बस स्थानक परिसरातील प्रवाशांना शरबत व थंड पाण्याचे व्यवस्था योग वेदांत समिती व महीला उत्थान समिती वणी मार्फत करण्यात आली.
या कार्यक्रमाअंतर्गत 1000 ऋषी प्रसाद मासिक व बाराशे शरबत ग्लास व थंड पाण्याचे उपस्थित प्रवाशांना वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रम कृष्णाजी जयस्वाल यांच्या सहकार्याने करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृष्णा जयस्वाल, पुंडलिक मत्ते, दिनकर ढवस, श्रीराम पोटे, विनायक मते, सुरेश डाहुले, हिरालाल चौधरी, संतोष चव्हाण, छाया विरुटकर, दुधुलकर काकू इंदिरा बल्की, राजूरकर सर, विकास नांदे, मोहिते व अनेक अनुयायांनी मेहनत घेतली.