शिवसेना जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांचा ओबी कंपन्यांना शेवटचा अल्टिमेटम.
12 मे ला कामबंद आंदोलनाचा इशारा.
राजु तुरणकर वणी
वेकोलीमधील माती उत्खनन (ओव्हर बर्डन) करणाऱ्या परिसरातील कंपनीमध्ये स्थानिक बेरोजगारांना ८०% रोजगार उपलब्ध करून देण्याकरीता बाध्य करावे या करीता यवतमाळ जिल्ह्याचे शिवसेना (UBT) जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी वणी SDO यांना निवेदनाद्वारे मागणी केली. जर येत्या 10 में या तारखेपर्यंत कंपन्यांनी जर भूमीपुत्रांना रोजगार देण्यास मज्जाव केला तर परिसरातील समस्त कंपन्याचे 12 में रोजी पासून “कामबंद आंदोलन” करण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला
वेकोली प्रशासनाने आणि माती उत्खनन (O.B) करणाऱ्या कंपन्यांनी तात्काळ दखल घेतली नाही तर कामगार कायद्याचे पालन करून येत्या १० मे पर्यंत स्थानिक बेरोजगारांना ८०% रोजगार उपलब्ध करून द्यावा अन्यथा वणी विधानसभा आ. संजय देरकर यांचे उपस्थितीत व शिवसेना (UBT) जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात १२ में रोजी तीव्र स्वरूपाचे “कामबंद आंदोलन” छेडण्यात येईल असा सज्जड दम निवेदनातून देण्यात आला आहे.यावेळी शरद ठाकरे उपजिल्हाप्रमुख, सुधीर थेरे शहर प्रमुख, प्रकाश कराड माजी पंचायत समिती उपसभापती, विनोद ढूमने, विलास बोबडे, आनंद धोटेकर, आदि शिवसैनिक उपस्थित होते.