अखेर मनिष बतरा यांना मिळाला न्याय.

0
752

अखेर मनिष बतरा यांना मिळाला न्याय.

कोळसा व्यापारी मनिष बतरा यांच्याविरुद्धचा गुन्हा सर्वोच्च न्यायालयात रद्द.

राजु तुरणकर – वणी.

वणी : ठरलेल्या करारानुसार कोळशाचा पुरवठा केल्यानंतर ८० लाख रुपये परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी वणीच्या एका व्यापाऱ्याविरुद्ध नागपूर लकडगंज पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा सर्वोच्च न्यायालयाने  रद्द करण्याचे आदेश दिल्याने व्यापाऱ्याला फार मोठा दिलासा मिळाला आहे.

वणीतील कोळसा आणि गारमेंटचे प्रतिष्ठित व्यापारी मनीष श्यामसुंदर बत्रा यांना नागपुरातील मित्तल एनर्जीस ऑफ इंडियाचे संचालक नितीन अग्रवाल यांनी २०१६-१७ दरम्यान जवळपास एक कोटीच्या कोळशाचा पुरवठा केला होता. हा पुरवठा एका दलालाच्या माध्यमातून केला होता.

दलालाच्या माध्यमातूनच देवाणघेवाण ठरली होती. बत्रा यांनी अग्रवाल यांना २० लाख रुपये दिले. उर्वरित ८० लाखांसाठी बत्रा हे टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आरोप नितीन अग्रवाल यांनी केला.

याप्रकरणी बत्राविरुद्ध आर्थिक शाखेत तक्रार दिली. ९ फेब्रुवारी २०२२ ला लकडगंज पोलिसांनी बत्राविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक करीत त्यांना एका सराईत गुन्हेगारासारखी वागणूक दिली होती. माञ खचून न जाता मनीष बत्रा यांनी लकडगंज पोलिसांच्या या कारवाईला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले व ही खोटी कारवाई रद्द करण्याची मागणी केली. २ एप्रिलला सर्वोच्च न्यायालयाने हा गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले. हा गुन्हा दिवाणी प्रकारचा असल्याचे मत न्यायालयाने नोंदविले. त्यामुळे प्रतिष्ठित व्यापारी मनीष बतरा यांना फसवणुकीचा डाव फसला. न्यायालयात बत्रा यांची बाजू अॅड. शैलेश सेतानी यांनी मांडली. अखेर खोट्या गुन्ह्यात फसवणुकीचा डाव निष्फळ झाल्याचे मनीष बत्रा यांनी लोकवाणीशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here