वणीत संतापजनक प्रकार, मुलीवर अत्याचार, अजुनही आरोपी मोकाट..

0
947

वणी शहराला कलंकित करणारी घटना, भर दुपारी निर्जन स्थळी मुलीवर अत्याचार झाल्याची संताप जनक घटना.

वणीतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर, अजूनही आरोपी मोकाट.

राजु तुरणकर.

मुलीचे अपहरण करत तिला मारहाण करण्यात आली व निर्जनस्थळी नेत एका विकृत बुध्दीचा अज्ञात व्यक्तीने त्या मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार वणीत घडला आहे. गुरूवारी दुपारी 1 ते 2 चा दरम्यान शहरातील गांधीनगर परीसरातील तळ्याजवळील वणी गॅस गोडाऊनचा मागें ही घटना घडली

प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी रानी (काल्पनिक नाव) वय १८ ही मुलगी वणी येथील गांधीनगर परीसरात एक वीटभट्टी आहे. त्या विट भट्टीकडे तुटलेल्या विटा जमा करण्याकरीता जात असतांनाच एका अज्ञाताची नजर त्या १८ वर्षीय मुलीवर पडली व तो अज्ञात आरोपी त्या मुलीचा मागे लागला. त्यातच त्यानें संधी साधून त्या चालत असलेल्या या पीडित मुलीला मागुन जोरात पकडले व तिला लाथाबुक्यांनी मारहाण केली व त्या मुलीला तळ्याजवळील काटेरी झुडपात घेवुन गेला व त्या पीडित मुलीशी बळजबरीने शारीरीक संबंध तसेच अनैसर्गिक शारीरीक संबंध केले व तो तेथून पसार झाला. पिडीत मुलगी असह्य वेदनेने विव्हळत कशीबशी घरी पोहोचली व आपल्या आईला आपल्यावरती घडलेल्या घटनेची आपबीती सांगितली. वडील पीडितेला घेवून वणी पोलीस स्टेशन गाठले व पोलिसात तक्रार नोंदविली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिसांची चमू विविध ठिकाणीं रवाना झाली.

याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात वणी पोलिस स्टेशनला कलम 64(1), 64(2) (1), 138,76,115 (2) भा.न्या.सं. या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. वणी पोलिस त्या विकृताचा शोध घेत आहे.

महिला सुरक्षा हा गंभीर प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणात तातडीने कारवाई करत आरोपीला पकडुन कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here