महाराष्ट्र राज्य धोबी समाज क्रांती विकास मंच च्या राज्य उपाध्यक्ष पदी नितीन बिहारी यांची नियुक्ती.
यवतमाळ येथिल कार्यक्रमात सन्मानित.
राजु तुरणकर – संपादक.
महाराष्ट्र राज्य धोबी समाज क्रांती विकास मंच चे अध्यक्ष शेखर कनोजिया, सचिव महेश देशकर आणि महासचिव डॉ प्रकाश गंगापारी यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात ४ मे रोजी ही नियुक्ती करून सन्मानित करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून धोबी समाज संघटनेचे काम करीत असताना श्री संत गाडगेबाबांच्या विचाराचे अनुकरण करून समाजात सामजिक उपक्रम राबवून, वणी शहरातील अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा विशेष सहभाग असल्याने त्यांची फार मोठी ओळख निर्माण झाली आहे.
या नियुक्तीमुळे समाज बांधव व मित्र परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.