उद्या यवतमाळात कर्जमाफीसाठी भव्य ट्रॅक्टर मोर्चा
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा …
संजय देशमुख खासदार यवतमाळ वाशिम व संजय देरकर आमदार वणी विधानसभा यांचे शेतकऱ्यांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन.
राजु तुरणकर – संपादक.
महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे वचन दिलं होत, परंतु अजून पर्यंत कर्जमाफीचे वचन पूर्ण केले नाही. महायुती सरकारने महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचा विश्वासघात केलेला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या न्याय्य मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने वनवासी मारुती देवस्थान आर्णी रोड यवतमाळ पासून जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ वर ट्रॅक्टर मोर्च्याचे आयोजन केलेले आहे. कर्जमाफीसाठी शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा !…. ट्रॅक्टर मोर्चा ही एक ठिनगी आहे भविष्यात वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आपापली ट्रॅक्टर घेऊन विदर्भातील सर्व शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केलेले आहे. या लक्षवेधी मोर्चाचे नेतृत्व संजय देशमुख खासदार यवतमाळ वाशिम, संजय दरकर आमदार वणी विधानसभा, राजेंद्र गायकवाड जिल्हा संपर्कप्रमुख, सागर ताई पुरी पूर्व विदर्भ संपर्क संघटिका, प्रवीण शिंदे जिल्हाप्रमुख, किशोर इंगळे जिल्हाप्रमुख, संजय निखाडे जिल्हाप्रमुख हे करणार आहेत.
वणी विधानसभा क्षेत्रातून उद्या हजारो शिवसैनिक या मोर्चात सहभागी होण्यासाठी यवतमाळ येथे धडकणार असून या मोर्चाची जय्यत तयारी आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी दिली आहे.