कुख्यात गुंड राजु कटर याला अटक.
वणीतील मुलीवर अतिप्रसंग करणारा संशयित आरोपीला अटक करण्यात वणी पोलिसांना यश.
शहरातील वीट भट्ट्याजवळ अतिप्रसंग व अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या संशयीताला वणी पोलिसांनी केली अटक.
राजु तुरणकर – संपादक.
राजू पोटे उर्फ कटर रा. खरबडा , वणी असे या अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. अखेर 7 दिवसांनंतर आरोपी गजाआड करण्यात वणी पोलिसांना यश आले. खरबडा गांधीनगर येथील वीट भट्ट्याजवळ विटांचे तुकडे गोळा करण्यासाठी गेलेल्या युवतीवर मागून येऊन आरोपीने तिला बळजबरीने झुडुपात नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. ही वणी शहराला कलंकीत करणारी घटना घटली होती.
त्याच दिवशी भट्टी परिसरातील मजुरांनी सदर इसमा बद्दल पोलिसांजवळ संशय व्यक्त केला होता, तो त्यावेळेस या परिसरात फिरत असल्याची स्पष्ट माहिती दिली होती,वणी पोलिसांनी चक्रे फिरवित तपासाची वाढविली मिळालेल्या माहितीवरून त्या संशयीताचा कसून शोध सूरू केला. अखेर तो सात दिवसानंतर मानकी शिवारात लपून असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली व त्याचा मुसक्या वणी पोलीसांनी आवळल्या, आरोपी वर अनेक प्रकाराचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, SDPO गणेश किंद्रे व वणी ठाणेदार PI गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात डीबी पथक प्रमुख API धीरज गुल्हाने, डीबी पथक व वणी पोलीस यांनी पार पाडली.