स्थानिक भूमिपुत्रांना काम हा आमचा अधिकार – संजय निखाडे

0
328

ओबी कंपन्यांची मुजोरी, काम महाराष्ट्रात नोकऱ्या परप्रांतियांना…..……… स्थानिक भूमिपुत्रांना काम हा आमचा अधिकार शिवसेना जिल्हाप्रमुख संजय निखाडे कडाडले….

कायद्याप्रमाणे प्रथम भूमिपुत्रांना रोजगार रोजगार द्या, अन्यथा कामे बंद करा….
Last Warning…. यानंतर उठा लूंगी बजा पुंगी आंदोलन.

राजु तुरणकर – संपादक.

वेकोलीमधील माती उत्खनन (ओव्हर बर्डन) करणाऱ्या परिसरातील खाजगी कंपनीमध्ये कायद्यानुसार स्थानिक बेरोजगारांना ८०% रोजगार उपलब्ध करून देण्याकरीता या करीता यवतमाळ जिल्ह्याचे शिवसेना (UBT) जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी वणी SDO यांना निवेदनाद्वारे 10 में तारखेपर्यंत कंपन्यांनी जर भूमीपुत्रांना रोजगार देण्यास मज्जाव केला तर परिसरातील समस्त कंपन्याना आज 12 में रोजी पासून ” कोणतेच काम करु देणार नाही” असा इशारा ही निवेदनातून देण्यात आला होता.

शेवटीं वेकोली प्रशासनाने आणि या मुजोर माती उत्खनन (O.B) करणाऱ्या कंपन्यांनी कोणतीही दखल घेतली नाही म्हणून GRN + SIDEX कंपनी वर “हल्लाबोल आंदोलन” शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने युवकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आ.

देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व यवतमाळ जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात दि. 12 में रोजी आंदोलन आयोजित केले आहे. सर्व शिवसैनिक, युवासैनिक, आजी-माजी पदाधिकारी तसेच समस्त युवकांनी व स्थानिक नागरिकांनी सकाळी १० वाजता सदर कंपनित उपस्थित राहून आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन शिवसेना यवतमाळ जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी केले आहे.

आपल्या परिसरातील प्रशासनातील काही भाडखाउ अधिकारी व राजकीय पुढाऱ्यामुळे ओबि कंपन्यांनी सातत्याने परप्रांतातील मजूर आणून कामे करून घेतली, मात्र स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारापासून वंचित राहावे लागले मागील अनेक दिवसापासून शिवसेना जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनामध्ये अनेक ओबी कंपन्यांना बोलावून या संदर्भात विचारपूस केली परंतु वेळ काढू धोरणाचा अवलंब करून कंपन्यातील अधिकारी या संदर्भात कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसून आले नाही. आजपर्यंत परिसरातील अधिकारी व राजकीय पुढाऱ्यांनी आपले आर्थिक हितसंबंध जोपासत याकडे दुर्लक्ष केले व स्थानिक बेरोजगार युवकांवरती अन्याय केला आहे. हीच बाब ओळखून आता अंतिम निर्णय घेत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी कंपनीवरती हल्लाबोल केला आहे व Last Warning देत भूमिपुत्रांना रोजगार देण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा या नंतर स्थानिक बेरोजगार भूमिपुत्रांना सोबत घेऊन उठा लुंगी बजा पुंगी आंदोलन करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here