स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून दिल्याशिवाय शांत बसणार नाही- संजय निखाडे

0
554

स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून दिल्याशिवाय शांत बसणार नाही-  संजय निखाडे

ओबी कंपन्यांना आठ दिवसाची मुदत, आज हल्लाबोल आंदोलन संपन्न. भूमिपुत्रांना न्याय मिळेल.

राजु तुरणकर – संपादक.

वेकोली मधील माती उत्खनन करणाऱ्या GRN व SIDEX कंपनी विरोधात आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक बेरोजगार भूमिपुत्रांना घेऊन हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

GRN कंपनी समोर हल्लाबोल निवेदनाची दखल न घेतल्याने संजय निखाडे यांच्या नेतृत्वाखाली बेलोरा, निलजाई, पुणवट, तरोडा, सुंदरनगर, लाठी बेसा, भालर येथील हजारो शिवसैनिक व बेरोजगार भूमिपुत्रांना घेऊन कंपनीच्या गेटवर काम बंद करण्याचा आज दुपारी एल्गार पुकारला. यावेळी वेकोलीचे अधिकारी व GRN कंपनीचे कर्मचारी आंदोलनस्थळी येवून चर्चा करून आठ दिवसांत स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी दिली. यावेळी संजय निखाडे यांनी ही Last Warning समजून स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार न दिल्यास येत्या सोमवारी कोणतीही पूर्व सूचना न देता सरळ खदान मध्ये येऊन आम्ही खदान बंद पाडू व यावेळेस प्रशासनाने आम्हाला गोळ्या घातल्या तरी चालेल परंतु आम्ही आता भूमिपुत्रावर होणारा कोणत्याही अन्याय सहन करणार नाही अशी भूमिका घेतली. यावेळी शरद ठाकरे , सुधीर थेरे, राजु तुरणकर, डॉ बोबडे, लुकेश्वर बोबडे, प्रशांत पाचभाई, विनोद ढुमणे, आनंद घोटेकर, संजय देठे, मनोज ढेंगले, अभय चौधरी, तुळशीराम मस्की, करण किंगरे, दिवाकर भोंगळे, सतीश वऱ्हाटे, शत्रुघ्न मालेकर, महेश सोमलकर, पुरुषोत्तम बुत्ते, संभा मते, रवी पोटे, सोमेश्वर गेडेकर, थेरे पाटील,स्मिता घनश्याम गोवारदिपे उपसरपंच ग्रामपंचायत तरोडा, वैष्णवी सतीश वराटे माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य  उपस्तीत होते.

यावेळी शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार माधव शिंदे यांनी पोलीस प्रशासना सह कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे विशेष प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here