वणी येथे खरीप हंगामपूर्व नियोजनाची तालुका स्तरीय आढावा बैठक संपन्न.
शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळून , शेतीपूरक जोड व्यवसाय निर्माण करावे – आमदार संजय देरकर.
राजु तुरणकर – संपादक.
वणी (प्रतिनिधी): वणी येथील महसूल भवनात तालुका कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम २०२५ पूर्व नियोजनाची तालुका स्तरीय आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. संजय देरकर होते.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे विधानसभा अध्यक्ष मा. दिलीप भोयर, इंजी. कुंडलिक ठावरी, अविनाश राऊत, भगवान मोहिते, डॉ. जगन जूनगरी, डॉ. बोबडे, पांढरकवड्याचे उपविभागीय कृषी अधिकारी चंदन निगोट , तसेच वणी तालुका कृषी अधिकारी पवन कावरे, झरी तालुका कृषी अधिकारी अमोल आमले, मारेगाव तालुका कृषी अधिकारी दीपाली खवलेआदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत बोलताना आमदार संजय देरकर यांनी शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत फळबाग लागवड आणि शेतीपूरक व्यवसायांकडे वळावे, असे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांमध्ये कृषीविषयक जागृती निर्माण करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे गरजेचे आहे.” असे प्रतिपादन केले.
बैठकीला वणी विधानसभा क्षेत्रातील कृषी विभागाचेअधिकारी, कर्मचारी, कृषी सेवा केंद्रांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. खरीप हंगामासाठी बियाणे, खते, कीडनाशके, सिंचन व्यवस्था व विविध योजनांची अंमलबजावणी यावर सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी तालुक्यातील उत्कृष्ट पिके घेणाऱ्या व शेतीपूरक व्यवसाय सुरू करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि समस्यांवर उपाय सुचवले. सकारात्मक चर्चासत्राने बैठकीचा समारोप झाला.