अडेगाव ग्रामपंचायत सरपंच पदाच्या चुरशीच्या लढतीत गंगाबाई काटकर विजयी.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली अडेगाव ग्रामपंचायतवर भगवा.
राजु तुरणकर – संपादक.
वणी विधानसभा क्षेत्रातील झरी जामनी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या अडेगाव येथे सरपंच अपात्र ठरल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी नव्याने निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. अकरा सदस्य असलेल्या ग्रामपंचायतचे दोन सदस्य अपात्र झाल्याने ९ सदस्य मधून सरपंच पदाची निवड करण्यात आली.
अत्यंत चुरशीच्या या लढतीत बिजेपीच्या मायाबाई अरुण हिवरकर यांचा पराभव करून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या गंगाबाई एकनाथ काटकर यांनी एक मताने विजयी झाल्या.
आघाडीचे सदस्य संजय आत्राम, वंदना पेटकर, निर्मला दिनकर पानघाटे आणि सविता पुरुषोत्तम आसुटकार यांच्या पाठिंब्याने गंगाबाई काटकर यांची बहुमताने निवड निश्चित झाली.
या विजयानंतर, नवनिर्वाचित सरपंच गंगाबाई काटकर यांचा सत्कार माननीय आमदार संजय देरकर व किरणताई देरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सीताराम पिंगे, मंगेश पाचभाई, अभय पानघाटे, जगन जुनगरी आणि विनोद धुमणे हे उपस्थित होते.