डॉ. प्रिया चंद्रकांत झाडे निधन.
मारेगावच्या माजी नगराध्यक्षा इंदुताई किन्हेकर यांच्या कन्या.
राजु तुरणकर……
चिखलगाव येथील महादेव नगरिमध्ये वास्तव्यास असणाऱ्या डॉ चंद्रकांत झाडे यांच्या पत्नी सौ. डॉ प्रिया चंद्रकांत झाडे यांचा काल रात्री 10:00 वाजताच्या सुमारास आजारपणामुळे आकस्मित नीधन झाले. गेल्या अनेक वर्षापासून वणी येथे वैधकिय सेवा देणाऱ्या प्रिया झाडे यांच्या आकस्मित निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात पोफळी निर्माण झाली असून झाडे परिवारावर दुःखाचा डोंगर पसरला आहे.
डॉ प्रिया यांच्या मागे पती चंद्रकांत झाडे , मुलगी, सासरा ,सासू असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्या मारेगावच्या माजी नगराध्यक्षा इंदुताई किन्हेकर यांच्या कन्या होत्या, त्यानी वयाच्या 35 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.आज सकाळी 11 वाजता चिखलगाव मोक्षधाम येथे अंत्यविधी होणार आहे.