मारेगावात जागतिक पर्यावरण दिन साजरा.

0
177

मारेगावात जागतिक पर्यावरण दिन साजरा.
आमदार संजय देरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण

राजु तुरणकर- संपादक 

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज मारेगाव येथील शासकीय विश्रामगृह परिसरात आमदार संजय देरकर व मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि निसर्गाचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील दरेकर, उप अभियंता सुहास ओचावार, पुरुषोत्तम भाऊ बुट्टे, अभय चौधरी, करण किंगरे, राजू मोरे, दुमदेव बेलेकर, संजय लांबट, नंदू कावळे, सुभाष बदकी, जगन जुनगरी, विनोद ढुमणे, राजू तुरणकर आणि विकास देशेट्टीवार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांनी आपल्या हातांनी विविध प्रजातींची रोपे लावून पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश दिला.


कार्यक्रमादरम्यान, आमदार संजय देरकर यांनी पर्यावरणाचे महत्त्व आणि वृक्षारोपणाची गरज यावर आपले विचार मांडले. वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता, प्रत्येकाने वृक्षारोपणात सक्रिय सहभाग घ्यावा, तसेच प्रत्येक ग्रामपंचायतने  वृक्षरोपण व वृक्ष संवर्धनाचे कामे करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमामुळे मारेगाव परिसरात हरितक्रांतीला प्रोत्साहन मिळेल आणि भविष्यात पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी नागरिकांना प्रेरणा मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here