बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट या विषयावर कार्यशाळा संपन्न.

0
106

बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट या विषयावर आरोग्य सेवक सेविका  यांची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न.

वणी शहरातील खाजगी रुग्णालयातील आरोग्य सेवक व सेविका यांना इंडियन मेडिकल असोसिएशन कडून विशेष मार्गदर्शन. 

राजु तुरणकर  वणी : इंडियन मेडिकल असोसिएशन वणी व सुपर्ब हायजेनिक डिस्पोजल प्रायव्हेट लिमिटेड चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 21 जून 2025 रोजी लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वणी येथे विविध रुग्णालयातील आरोग्य सेवक व सेविका यांचे करिता बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट या विषयावर एक विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

बायोमेडिकल वेस्ट :-  ट्रीटमेंटची उद्दिष्टे, कचऱ्याचे धोके कमी करणे किंवा काढून टाकणे आणि सामान्यतः कचरा ओळखता न येणारा बनवणे हे आहे. प्रक्रियेने कचरा नंतरच्या हाताळणी आणि विल्हेवाटीसाठी सुरक्षित कसा केला पाहिजे. ही उद्दिष्टे पूर्ण करू शकतील अशा अनेक उपचार पद्धती आहेत. त्यात जैव कचरा वेगळे करणे व योग्य विल्हेवाट कशी लावणे या अनुषंगाने प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली  आहे.

या कार्यशाळेत श्री.निशांत सोनटक्के व श्रीमती विथीका वैद्य यांनी बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट या विषयावर सर्वांना ईत्यंभुत माहिती दिली. तसेच उत्स्फूर्तपणे सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले. दवाखान्यातील रुग्णांना वापरण्यात आलेले सर्व वेस्टेज साहित्य त्याची विल्हेवाट कशी लावायची या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती देऊन आरोग्य सेवक, सेविका यांना या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेला आयएमएचे पदाधिकारी तसेच होमिओपॅथी असोसिएशन व आयुर्वेदिक असोसिएशन यांचे सर्व डॉक्टर मंडळी उपस्थित होते. आयोजित या कार्यशाळेला जवळपास 80 ते 90 स्टाफ नर्सेस हॉस्पिटल कर्मचारी व डॉक्टर्स प्रामुख्याने उपस्थित होते.सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार आयोजकांच्या वतीने माणण्यात आले.

ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन वणीचे डॉ. शिरीष कुमारभार, डॉ. सुनील जुमनाके, डॉ.संकेत अलोणे, डॉ. स्वप्नील गोहोकार यांसह असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here