वणी विधानसभा मतदारसंघात भाजपला जबर झटका.

0
893

वणी विधानसभा मतदारसंघात भाजपला जबर झटका.

आमदार संजय देरकर यांच्या संयमी नेतृत्वावर वर विश्वास ठेवत अनेक बडे नेते शिवसेनेत दाखल.

राजु तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.

वणी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. भाजपसह विविध पक्षांतील अनेक स्थानिक नेते, सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी सन्माननिय आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश केला. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वणीतील राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हा भव्य पक्षप्रवेश सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी खासदार अरविंद सावंत, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार संजय देरकर, संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे, संजय निखाडे, किशोर इंगळे, उपजिल्हा प्रमुख शरद ठाकरे, विधानसभा प्रमुख सुनील कातकडे, तसेच ज्येष्ठ नेते सुधीर थेरे, प्रशांत पाचभाई, सतीश नाईक ,नीलेश जैन ,राजेश कवाने, राहुल सोनुने , बालाजी मिलमिले, यांची उपस्थिती होती.

शिवसेनेत प्रवेश केलेले प्रमुख नेते – वणी मतदारसंघ:

बंडू चांदेकर (माजी जिल्हा परिषद सदस्य – भाजप,संघदीप भगत माजी जिल्हा परिषद सदस्य – भाजप, दिलीप काकडे (माजी जिल्हा परिषद सदस्य – अपक्ष,अनिल देऊळकर (सरपंच – भाजप,बबन वाटेकर (सरपंच – भाजप),ज्ञानेश्वर टांगे (काँग्रेस), मंगेश काकडे (काँग्रेस), विजय ठावरी (सरपंच), प्रेमा धानोरकर (उपसरपंच), रवींद्र पोटे (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती – मारेगाव), मोहम्मद अशरफ (राष्ट्रवादी काँग्रेस),मोहम्मद असलम (राष्ट्रवादी काँग्रेस), रोशन साव (सामाजिक कार्यकर्ते),फैजल शेख स्थानिक युवा नेते  यांनी थेट मुंबई येथे मातोश्रीवर जावून प्रवेश केल्याने भाजपला स्थानिक पातळीवर मोठा फटका या पक्षप्रवेशामुळे बसला आहे. भाजपच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात शिवसेनेने थेट हस्तक्षेप केल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. भाजपमधील माजी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच आणि स्थानिक पातळीवरील प्रमुख नेते पक्ष सोडून गेल्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता आणि गोंधळाचं वातावरण आहे.

नुकतीच झालेली जिल्हाध्यक्ष पदाची नियुक्ती, स्थानिक कार्यकर्त्यांबाबतचा उदासीन दृष्टीकोन आणि अंतर्गत गटबाजी यामुळे असंख्य कार्यकर्ते नाराज होते. या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश झाला असून, तो भाजपसाठी गंभीर इशारा मानला जात आहे.

“ही फक्त सुरुवात आहे” – आमदार संजय देरकर

“ही केवळ सुरुवात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ही सामान्य जनतेच्या हक्कासाठी लढणारी संघटना आहे. वणीसह उमरखेडमध्ये शिवसेनेचा झेंडा अधिक भक्कमपणे फडफडेल. जनतेच्या प्रश्नांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचं शिवसेनेत मनापासून स्वागत आहे.” – आ. संजय देरकर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here