रेल्वे उडान पूल बांधकामा वरुन शिवसेना (उबाठा) आक्रमक ….
तीव्र आंदोलनाचा इशारा…
राजु तुरणकर – संपादक 9422673123
वणी शहराला लागून असलेल्या चिखलगाव व वणी वरोरा रोड वरिल केंद्र सरकारच्या अधिनस्थ येत असलेल्या रेल्वेक्रॉसिंग उड्डाणपूल बांधकामा संदर्भात सर्विस रोड उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना उबाठा च्या वतीने करण्यात आली आहे.
चिखलगाव जवळ वणी यवतमाळ व वणी वरोरा या मार्गावर उडान पुलाचे बांधकाम सुरू असून नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी आवश्यक असलेले व कामाच्या अंदाजपत्रकात नमूद सर्विस रोडची पर्यायी व्यवस्था ऊपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत ही अतिशय गंभीर बाब व बुद्धी पुरस्कार दुर्लक्षित पणा करीत असल्याचे समोर आलेले आहेत. ह्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून सातत्याने अपघात घडत आहेत. सत्ताधारी पक्षाने जनतेची डोळेझाक करण्याकरिता वारंवार निवेदन देवून आतून समर्थन करीत असल्याचे बाब समोर आली व संबंधित कंत्राटदार मनमानी कारभार करीत असल्याचे दिसुन आले आहे.
जनतेच्या वर्दळसाठी सुरक्षेतेसाठी पर्यायी मार्ग त्वरित ऊपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा झालेल्या सर्व अपघाताची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित कंत्राटदार सी एस कंट्रक्शन हे राहतील व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात येईल.तसेच नागरिकांच्या सुरक्षतेसाठी उग्र आंदोलनाचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. संतोष कुचनकर तालुका प्रमुख यांच मार्गदर्शनात सदर कंपनीला निवेदन देण्यात आले यावेळी डॉ जगन जुनगरी, सुधीर ठेंगणे, शंकर देरकर व शिवसैनिक उपस्थित होते.