वणीत शिवसेनेचा राडा, मंत्र्याचा अडविला ताफा.

0
336

वणीत शिवसैनिकांचा राडा, उईक यांचा अडविला ताफा…

पोलिसांची शिवसैनिकांसोबत झटपट….

राजु तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.

आज वणी शहरात शासकीय आढावा बैठकीच्या ओचीत्याने आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हे वाणी विश्राम गृहातून बैठक स्थळी वसंत जिनिग कडे जात असताना बस स्टँड जवळ दबा धरुन बसलेले असंख्य शिवसैनिक रस्त्यांवर अचानक उतरून ताफा अडविल्याने वणी पोलिसांची तारांबळ उडाली.

वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या मार्गदर्शनात प्रचंड जोशात शिवसैनिकांनी थाफा अडवून राडा केला. ओला दुष्काळ जाहिर करा. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा , या मागणीसाठी गगनभेदी घोषणा देत परीसर दुमदमुन टाकला..

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा भर रस्त्यांवर असंख्य शिवसैनिक रस्त्यांवर अचानक उतरून ताफा अडवील्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. प्रचंड मोठ्या प्रमाणात सातत्याने पाऊस पडल्याने सोयाबिन संपुर्ण खराब झाले असून कपाशीचे पीक बोंड सडून पडत आहे, अश्या वेळी बळी राज्याला धीर देणे गरजेचे आहे, परंतू भाजपचे सरकार मात्र शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेत नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असंख्य शिवसैनिक उग्र भूमिका घेत रस्त्यांवर उतरले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय निखाडे, संतोष कुचनकर तालुका प्रमुख होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here