शहरातील शिंगाडा तलावात एका इसमाचा मृतदेह, इसम तलावात गेले कसे चर्चेला उधाण .
वेकोली कर्मचारी असलेला इसमाचा संशयास्पद मृतदेह आढळला.
राजू तूरणकर
अशोक पुंडलिक बोढेकर वय अंदाजे (५७) ढुमे नगर टॉवर जवळ वणी असे मृतकाचे नाव आहे. आज रविवारी सकाळी दिपक चौपाटी परिसरातील शिंगाडा तलावातएक मृतदेह तरंगत असल्याचे काही लोकांना दिसून आल्या नंतर परिसरात खळबळ उडाली. याबाबतची माहिती कोणीतरी पोलिसांना सांगितले व वणी पोलिस घटनास्थळी पोहोचले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
अशोक बोढेकर यांचा नेमका कसा काय तलावात बुडून मृत्यू झाला, त तलावात कश्यासाठी गेले की घातपात याची माहिती मिळु शकली नाही. पोलिस तपासात मृत्युचे नेमके कारण उघड होनार आहे. पुढील तपास वणी पोलीस करत आहे.