वरोरा येथे श्री संत गाडगे बाबांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना.

0
288

वरोरा येथे संत गाडगेबाबांच्या 150 व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम — समाज एकतेचा शक्तिशाली संदेश.

प्रदीप मुके वणी यांचे हस्ते श्री संत गाडगे बाबांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना. आमदार करन देवतळे यांच्या हस्ते अनावरण.

राजू तुरणकर – संपादक.

वरोरा येथे संत शिरोमणी श्री संत गाडगेबाबांची 150 वी जयंती मोठ्या उत्साहात व समाजएकतेच्या वातावरणात साजरी करण्यात आली. समाजाच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या संत गाडगेबाबांच्या मूर्तीचे दानदाते प्रदीपजी मुक्के (वणी) यांच्या माध्यमातून प्रतिष्ठापना करण्यात आली.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार करण देवतळे तसेच धोबी परीट सर्व भाषिक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवरावजी सोनटक्के उपस्थित होते. त्यांच्या हस्ते श्री संत गाडगेबाबांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संत गाडगेबाबांच्या विचारांची आजच्या समाजाला असलेली गरज अधोरेखित केली.

प्रदीप मुके वणी यांचा सन्मान.

विशेष म्हणजे, प्रदीपजी मुक्के यांनी जयपूर येथून संगमरवरी दगडाची संत गाडगेबाबांची मूर्ती (₹51,000) तसेच वाहतूक खर्च (₹18,000) असा एकूण ₹73,000 खर्च करून मूर्ती दान दिली. समाजासाठी दिलेल्या या योगदानाबद्दल त्यांचा आमदार करण देवतळे व देवरावजी सोनटक्के यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन प्रदीप मुके यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. समाजासाठी उदारपणे पुढे येणाऱ्या दानशूर व्यक्तिमत्त्वाचा यावेळी सर्वांनी गौरव केला.

या कार्यक्रमात सप्त खंजिरी वादक तुषार सूर्यवंशी महाराज यांच्या प्रबोधनपर कीर्तनाने वातावरण भारावून गेले. त्यांनी संत गाडगेबाबांच्या स्वच्छता, समाजसेवा व अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विचारांचा प्रभावी संदेश देत समाजाने त्यांच्या शिकवणीचे आचरण करावे असे आवाहन केले.

या जयंतीनिमित्त डॉ. सविता जाधव व डॉ. रोडे यांच्या वैद्यकीय टीमच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नागरिकांची नेत्र तपासणी, आरोग्य मार्गदर्शन तसेच मोफत औषधांचे वितरण करण्यात आले. मोठ्या संख्येने नागरिकांनी या आरोग्य सेवेचा लाभ घेतला. समाजसेवा हीच खरी संत गाडगेबाबांना मानवंदना असल्याचे यावेळी सांगण्यात आले

या प्रसंगी अहेते श्याम अली माजी नगराध्यक्ष, भैयाजी रोहणकर ज्येष्ठ मार्गदर्शक, दिलीपजी शिरपूकर, प्रदीपजी मुक्के , राजु भाऊ तुरणकर, अनिकेत नाकाडे, किशोरजी फिरके, सूनिल भोयर, अध्यक्ष अतुलभाऊ क्षीरसागर, उपाध्यक्ष राजुभाऊ चिंचोलकर, किशोर केळझरकर सचिव, बंडूजी ताजणे, अशोकराव चिंचोलकर, अनिलभाऊ क्षीरसागर, दिवाकरभाऊ क्षीरसागर, अशोकराव भोयरकर, भैय्याजी तुराणकर, श्रीमती कलावती क्षीरसागर, रविकांत घोलप सर, नरेंद्रभाऊ क्षीरसागर, भास्कर पत्रकार, दत्तूजी चिंचोलकर, निलेश भोयरकर, अक्षय नाकाडे, प्रणय क्षीरसागर, प्रवीण क्षीरसागर, बंडूभाऊ क्षीरसागर, रमेश क्षीरसागर, मनोहर क्षीरसागर , मनोहर नांदे यांसह समाजाचे पदाधिकारी व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजातील ऐक्य, सेवा आणि संत गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा जपण्याचा निर्धार या कार्यक्रमातून व्यक्त झाला. वरोरा शहर व बोर्डा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here