वणी शहरात पेट्रोलसाठी नागरिकांच्या लांबलचक रांगा — प्रशासन मात्र अनभिज्ञ!

0
1243

वणी शहरात पेट्रोलसाठी नागरिकांच्या लांबलचक रांगा — प्रशासन मात्र अनभिज्ञ!

केवळ अफवा नागरिकांनो सावधान.
राजु तुरणकर – वणी 
शहरात आज अचानक पेट्रोल पंपांवर नागरिकांची प्रचंड गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रात्री साडेदहा वाजेपर्यंतही पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या लांबलचक रांगा लागलेल्या दिसून आल्या.
जागतिक पातळीवर इराण–इजराइल–अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे पेट्रोल टंचाई निर्माण होणार, असा समज नागरिकांमध्ये पसरला आहे. “पेट्रोलचा साठा संपत आला”, “उद्या पेट्रोल मिळणार नाही” अशा अफवांनी वणीकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल भरण्यासाठी पंपांकडे धाव घेत आहेत.
मात्र या गंभीर परिस्थितीत महसूल प्रशासन पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रशासनाशी मोबाईलवर संपर्क साधला असता “आम्हाला याबाबत काहीच माहिती नाही” असे उत्तर देण्यात आले.
प्रश्न उपस्थित होतो — नागरिकांमध्ये एवढी भीती पसरत असताना प्रशासन झोपेत आहे का?
अफवांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कोणाची?
आणि जर खरोखरच टंचाईची शक्यता असेल, तर याबाबत स्पष्ट भूमिका का घेतली जात नाही?
सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पुढाकार घेऊन नागरिकांना योग्य माहिती देणे गरजेचे आहे, अन्यथा ही गर्दी आणि घबराट आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अफवांना पूर्णविराम देत पियूष लाठीवला (पेट्रोल पंप मालक) यांनी स्पष्ट केले की,पेट्रोलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here