वणी लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल चा एस.एस.सी. परीक्षेत १०० टक्के निकाल.
अनिकेत मधुकर तुरानकर 97%गुण घेवून शाळेतून प्रथम तर तालुक्यातून दुसरा…
राजु तुरानकर वणी : वणी लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल चा एस.एस.सी. (फेब्रुवारी २०२६) परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी शाळेची गौरवशाली परंपरा कायम राखत घवघवीत आणि कौतुकास्पद यश संपादन केले आहे.
यामध्ये अनिकेत मधुकर तुराणकर याने ९६.६० टक्के गुण प्राप्त करून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला असून तालुक्यात द्वितीय येण्याचा मान मिळविला आहे. कु. वैष्णवी नितीन भालेराव हिने ९६.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक तर आरूष सुधीर खराटे याने ९६.०० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.
शाळेतील एकूण १६३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ७० विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असून १४ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत. तसेच ५५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ३५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष बलदेव खुंगर, सचिव सुधीर दामले, कोषाध्यक्ष चंद्रकांत जोबनपुत्रा, लायन्स क्लब चे अध्यक्ष तुषार नगरवाला, संचालक शमिम अहेमद, नरेंद्र बरडिया, किशन चौधरी, महेंद्र श्रीवास्तव, डॉ. के. आर. लाल, रमेश बोहरा, अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्या चित्रा देशपांडे, वर्गशिक्षक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.













