म्हैसदोडका येथे विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

0
556

म्हैसदोडका येथे विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या.

आनंद नक्षणे—मारेगाव

मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथील संगीता रोहिदास हेपट वय वर्ष ४५ विवाहितेने पुंडलिक बोधाने यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आज सकाळी ८ वाजता आपली जीवनयात्रा संपविली.

सद्या ती पतीसोबत पटत नसल्याने वडीलाकडे राहत होती. त्यामुळे ती मानसिक तणावात असल्याचे बोलले जात आहे.तिच्या पोटचा एक मुलगा असून आत्महत्या मागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here