लढा संघटनेची कार्यकारणी रासा येथे गठीत. रासा ग्रामपंचायत मध्ये घरकुल वाटपावरून सावळा गोंधळ.
राजू तूरणकर–संपादक.
रासा ग्रामपंचायत अंतर्गत गावातील गरजवंतांना डावलून घरकुल वाटप केल्याच्या आरोपामुळे जनमानसात असलेल्या आक्रोशाला लढा संघटनेने पाठिंबा दिल्यामुळे गावातील जनता या संघटनेच्या कार्यप्रणाली खुश होऊन लढा संघटनेची शाखा या ठिकाणी स्थापन करण्यात आली. यामध्ये अशोक साकीनवर समन्वयक पदी निवड करण्यात आली. सदस्य पदी सतीश हिवरकर , गणेश उरकुडे ,जगदीश कोटनाके , रमेश नागूलवार ,अक्षय कोडापे, सुरेश साकीनावर, निखिल टेकाम, आकाश जेऊरकर,हुसेन नैताम, नवनाथ मडावी, गोविंदा नागूलवार यांची निवड करण्यात आली.
लढा संघटनेचे प्रवीण खानझोडे यांनी रासा येथील घरकुल धारकाची बैठक घेत गावातील स्थानिक समस्या गावात स्वतः फिरून समजून घेतल्या.ह्यावेळी संकेत मोहिते, धनराज येसेकर, राजूभाऊ काळे, प्रफुल इंगळे ह्यावेळी सदर बैठकीला उपस्थित होते.
रासा ग्रामपंचायत मध्ये घरकुल वाटपात प्रचंड घोळ असून प्रस्तावित यादी ही ग्रामसभेत मंजूर यादी प्राधान्य क्रमानुसार त्याची निवड करण्यात यायला पाहिजे होती परंतु तस न करता सरपंच व सदस्य हे घरकुलचा लाभ आपल्या मन मार्जि तील लोकांना देत असल्याचा आरोप रासा गावातील ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती वणी यांच्या दालनात आरोप करून ह्या प्रकरणा कडे लक्ष वेधण्यात आले आहे. केंद्र सरकार व राज्यसरकार यांनी वेगवेगळ्या समुदायतील लोकांना या शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक पात्र लाभार्यांना घर देण्याच स्वप्न स्थानिक लोकांना देण्यात आले आहे. परंतू ग्रामपंचायत स्तरावर मात्र मोठ्या स्वरूपात घोळ, स्तुती पाठक लोकांना व चिरमिरी देणाऱ्या लोकांना घरकुलाचा लाभ देण्यात येत असल्याचा बोलले जातं आहे म्हणुन रासा येथील नागरिक व महिला यांनी ज्या फाईला तयार करायला सांगण्यात आले आहे त्यामुळे त्यांना झालेला खर्च हा व्यर्थ केला व आता आम्हाला घरकूल मिळणार नाही असा दम गावातील सरपंच व सदस्य दिला असा आरोप सुद्धा केलाला आहे म्हणून ह्य प्रकरणी सखोल चौकशी करून पीडित लोकांना न्याय देण्यात येणार ह्यावेळी गावातील शेकडो लोक उपस्थित होते