खळबळ जनक घटना…. जिवंत विद्युत तार कापल्याने युवकाचा मृत्यू

0
1498

जिवंत विद्युत तार कापण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवकाचा करंट लागल्याने मृत्यू.

दोन महिन्यात तीन युवक करंट लागल्याने मृत्युमुखी, पोलीस प्रशासन अनभिज्ञ.

कायर पासून वणी पर्यंत करोडोची तार गेली चोरी तरी विद्युत वितरण चे अधिकारी साखर झोपेत.

राजू तूरणकर- संपादक.

वणी तील भंगार व्यवसायाची व्याप्ती पाहता करोडो रुपयांची उलाढाल या व्यवसायाच्या माध्यमातून होत असते. वणीतील अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम, भालर रोडवरील गिरजा शंकर सोयाबीन कंपनी, डब्ल्यूसीएलचे तांबे चोरी आणि आता एम एस सी बी चे जिवंत  जर्मनी विद्युत तार कापून नेण्याचा सपाटा मागील अनेक महिन्यापासून सुरू आहे.

१७ नोव्हेंबरच्या रात्री मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परसोडा या गावाच्या परिसरात चोरीच्या उद्देशाने जिवंत विद्युत तार कापल्याने शंकर सुपारी कुंमरे खरबडा मोहल्ला वणी वय 20 वर्ष नावाचा युवक विद्युत करंट लागल्याने खाली पडला व मृत्यूमुखी झाल्याची गंभीर व खळबळ जनक घटना घडली आहे

शुक्रवार दिनांक १७ नोव्हेंबर ला रात्री वणी शहरातील रंगनाथ नगर कोंडणावाडी येथील कुख्यात भंगार चोरी करणाऱ्या युवकाने शंकर सुपारी कुंमरे या मिस्त्री काम करणाऱ्या युवकाला घरून रेती काढण्यासाठी घरून बोलावून नेले. मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परसोडा गावाजवळ विद्युत तार कापल्याने एका शेतात शंकर खाली पडला त्याला सोबत असलेल्या युवकांनी कायर येथे दवाखान्यात नेले तिथे त्याच्यावर प्रथम उपचार करून त्याला रेफर केल्यानंतर वणी ग्रामीण रुग्णालयात आणले असता तो मरण पावला होता. सदर घटने संदर्भात वणी, मुकुटबन व शिरपूर या तिन्ही ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त पुढील बातमीत.

विद्युत वितरण चा भोंगळ कारभार अधिकारी साखर झोपेत, भंगार व्यवसायिकांचे प्रशासनाशी ………. यापूर्वी झालेल्या दोन तरुणांच्या मृत्यूची सविस्तर माहिती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here