विद्युत महावितरणचे लोखंडी पोल, जर्मन तार चोरी गेल्याची तक्रार..
तार कापून नेण्याचा प्रयत्नांत तीन युवक पडले मृत्युमुखी … दोन दिवस लाईन होती बंद, परिसरातील नेते मंद..
मुख्य सूत्रधार समोर येवूनही मोकाट…. भंगार वाले झाले सैराट
राजू तूरणकर–संपादक लोकवाणी जागर.
लालगुडा वणी येथिल महापारेषन 220kV सबस्टेशन येथून गेलेली 33kV साखरा (दरा) HT लाईन (33/11KV साखरा (दरा) ता. वणी सबस्टेशन पर्यंत आलेली) वरील विद्युत लोखंडी पोल, त्यावरील फेब्रीकेट केलेले लोखंडी च्यानल, अलुमिनिअम विद्युत तारांचे व 33KV इन्सुलेटर चोरी गेल्याची तक्रार पोलीस स्टेशन, वणी येथे पंकज रामभाऊ नंदलवार, सहाय्यक अभियंता, महावितरण केंद्र, घोन्सा उपविभाग झरी यांनी केली आहे.
महावितरण लालगुडा ता. वणी येथील 220kV पारेषण सबस्टेशन ते 33/11kV साखरा दरा सबस्टेशन वणी येथे गेलेली महावितरण कंपनीची 33kV साखरा (दरा) 3phase Wire HT लाईन वरील विद्युत लोखंडी पोल (13meter height = RSJ-poles), त्यावरील फेब्रीकेट केलेले लोखंडी च्यानल, अलुमिनिअम विद्युत तारांचे (100 sq.mm. size AAAC conductor), इन्सुलेटर (33kV polymer suspension+pin type insulators) आदी वस्तूंची अज्ञात चोरट्यांनी चोरी करून महावितरण कंपनीचे मौजे पेटुर-मानकी या गावांच्या परिसरातील सदर 33KV HT line चे चार लोखंडे, पोल (5span=0.25km किंमत अंदाजे रु.137390/-), अंदाजे 245 kg फेब्रीकेट केलेले लोखंडी च्यानल (किंमत अंदाजे रु.18930/-) आणि मौजे उमरी नवरगाव या गावांच्या परिसरातील 09 गाळे मधील विद्युत तार (09span = 1350mtrs, किंमत अंदाजे रु.106237/-) व 21 इन्सुलेटर (33kV polymer type, किंमत अंदाजे रु.8277/-) चोरी झालेले आहे.सदर घटना होण्यापूर्वी सदर 33kV HT line तपासणी करण्यात आली होती असे अधिकाऱ्यांचे सांगणे आहे.
वरील घटनेमध्ये एकूण रु.270834/- इतक्या महावितरणच्या मालमत्तेची चोरी झाल्याची तक्रार करण्यात आली, यापूर्वी सुद्धा अशा अनेक तक्रारी मुकुटबन शिरपूर वनी पोलीस ठाण्यात देण्यात आल्या आहेत परंतु कोणत्याही आरोपीला आज तागायात अटक करण्यात आली नसल्याचे महावितरण अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वणी एमआयडीसी परिसरातील 30 ते 40 लोखंडी पोल चोरून नेल्याची घटना घडली आहे.
मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परसोडा या परिसरात विद्युत तार कापण्याच्या प्रयत्न करत असताना शंकर कुमरे हा युवक मृत्युमुखी पडला, आणि या घटनेतून जे मुख्य सूत्रधार समोर आलेत ते वणी ठाण्यात आणून त्यांची तपासणी करून त्यांना पुन्हा सोडून देण्यात आले असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मात्र भंगार व्यवसायिक सैराट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
परसोडा परिसरातील विद्युत पुरवठा दोन दिवस बंद होता, मात्र परिसरातील नेते मंद असल्याने यासंदर्भात कुठेही आवाज उठवण्यात आला नाही व कोणत्याही मीडियाने या गंभीर बाबीची नोंद घेतली नाही हेही तेवढेच खरे.