मेघदूत कॉलनी येथील सम्यंक बुद्ध विहार येथे संविधान दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न.
आनंद नक्षणे –मारेगाव.
वणी मेघदूत कॉलनी चिखलगाव येथील सम्यंक बुद्ध विहार येथे संविधान दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला . प्रथम महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध व परमपूज्य बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे हारार्पण करून व मोमबत्ती प्रज्वलित करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. विनोद बहादे व आयु .महादेव भालशंकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळेस भालशंकर सरांनी आपल्या भाषणात सांगितले की भारतीय राज्यघटनेत समता स्वातंत्र्य बंधुत्व व न्याय हे बुद्धाच्या धम्मा मधून घेतले आहे. आपल्या अध्यक्षीय भाषणातून बहादे यांनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेतील प्रत्यक्ष शब्दाचा अर्थ समजून सांगितला व भारतीय राज्यघटना जगात कशी श्रेष्ठ आहे विषद केले. तसेच अन्वीका वासेकर या लहान मुलीने शाळेत शिकवणारी प्रतिज्ञा भारत माझा देश आहे व भारतीय घटनेचे उद्देशिका वाचून दाखवली. त्यानंतर 26/11 च्या हल्लात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.. कार्यक्रमाचे संचालन सचिन वानखेडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कवडू पाटील, हरीश वासेकर, अनिल पाटील, सौरभ बहादे, संगीता वाघमारे, लिलाबाई वासेकर, उषाताई बारशिंगे, सुचिता पा टील, वंदना भालशंकर सरला बहादे,मेघा बारशिंगे ,प्रियंका वानखेडे, मेघा कोयरे, तामगाडगे ताई, ठमके ताई, करमनकर ताई, जयश्री धोटे, प्रणिता वासेकर, नीता बहादे, भाग्यश्री शंभरकर , हर्षु गोहने इत्यादींनी परिश्रम घेऊन कार्यक्रम साजरा केला.