रिलायन्स मॉल मध्ये ग्राहकाची अप्रत्यक्ष लुट.
By one get one free या शब्दाखाली ग्राहकांची फसवणूक..
राजू तूरणकर–वणी.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा वणीला विनय कोंडावर आणि राजु तुरणकर यांच्या कडून मॉल मध्ये असलेल्या वस्तूंच्या किंमतीत आणि बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या त्या वस्तूच्या एमआरपी मध्ये प्रचंड तफावत असल्याची तक्रार प्राप्त झाली. तक्रार कर्त्यांसोबत सदर मॉलला कुंतलेश्वर तुरविले अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत वणी आणि अमितजी उपाध्ये संघटक अखिल भारतीय ग्राहक पंचायत वणी , अजिंक्य शेंडे यांनी प्रत्यक्ष मॉलला भेट देऊन मॉल च्या मॅनेजर सोबत चर्चा करून सदर बाब गंभिर असल्याचे निदर्शनास आणुन दिले. मॉलचे तक्रार पुस्तिका मागवून पंचासोबत तक्रार पुस्तिके मध्ये तक्रार दखल करण्यात आली. सदर तक्रारीची प्रत्यक्ष दाखल घेवून ग्राहकाची फसवणूक थांवण्यात यावी अन्यथा पुढील रीतसर कार्यवाहीचा इशारा देण्यात आला.तक्रार दाखल करतांना कुंतलेश्वर तुरविले, विनय कोंडावार, अमित उपाध्ये, राजु तुरणकर, अजिंक्य शेंडे आणि चैतन्य तुरविले हजर होते.
(By one get one free) एक घ्या त्यावर एक मोफत अस अशा शब्द प्रयोग केला आहे. डेटॉल स्किन केअर handwash हे 650ml ची वस्तू ग्राहकांना रिलायन्स मॉल मध्ये 198 रुपयाला दोन पॅक ( पाउच)दिली जाते. परंतु ही वस्तू बाजारात केवळ 99 रुपयात ऊपलब्ध आहे. याचा अर्थ दोन्ही पाउच चे पैसे घेवून ग्राहकांना काही मोफत न देता, मानवी मेंदूला लालची भुरळ पाडून, मोहात टाकून रिलायन्स मॉल कडून फसवणूक केली जाते आहे. आणि एका पाउचवर 198 रुपये अशी किंमत टाकून गैरकायदेशिर कृत सुद्धा करीत आहे.
वणीतील प्रतिष्ठित नागरिक विनय कोंडावार हे रिलायन्स मॉलमध्ये डेटॉल कंपनीचे handwash घेण्याकरता गेले असता तिथे त्यांनी By one get one free वाचून तिथून 198 मध्ये वस्तू खरेदी केली परंतु, मार्केट मध्ये ते दोन पाउच 198 लाच मिळते हे पाहून, एक फ्री मिळते म्हणून आपण गरज नसतांना दोन पाउच घेतल्या व आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तक्रार केली आहे.