बोलेरो गाडी पेटवणारे आरोपी अजूनही मोकाटच

0
592

माजी नगरसेवकाची बोलेरो गाडीला पेटवनारे आरोपी अजूनही मोकाट, पोलिसांना आरोपी गवसेना.

CCTV कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत आहे आरोपी…..
गुन्हा घडला तर cctv लावा सांगणारे पोलीस ठरत आहे अकार्यक्षम.

आनंद नक्षणे

शिवसेनेचे माजी शहर प्रमुख , माजी नगरसेवक राजू तुराणकर यांची 30एप्रिल 2023 च्या मध्यरात्री बोलेरो गाडी क्रमांक MH 31-CS -7900 ला 2:30 वाजे दरम्यान गाडीला आग लावून पेटवून दिल्याची घटना घडली होती.

रात्री 2:30 दरम्यान कोणी अज्ञात इसमाणी डाव्या बाजूची काच मोठ्या दगडाणी फोडून गाडीत जव्व्लनशील पदार्थ ओतून गाडीला आग लावल्याची गाडीत पडलेल्या गोटया वरून लक्षात आले होते. यासंदर्भात वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सदर घटनेचे आरोपी cctv कॅमेऱ्यात कैद झाले आहे . आरोपी स्पष्ट दिसत आहे, मात्र पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना हे प्रकरण तपास करण्यासाठी दिले त्यांचे या संदर्भात उदासीन धोरण अवलंबिले आहे. त्यांना त्या cctv मधील आरोपी स्पष्ट दिसत नाही किव्हा काय झाले हे सुध्दा ते बोलावून माहिती देत नाही. त्यामुळे गंभीर गुन्ह्यात सुद्धा पोलीस प्रशासन गंभीर दिसून येत नाही.

एखाद गंभीर घटना झाल्यास सीसीटीव्ही तपासणारे, जनतेला cctv लावा म्हणून सांगणारे पोलीस मात्र या गुन्ह्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज मध्ये आलेले आरोपी शोधू शकत नसल्याने, आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे,  तर सीसीटीव्ही फुटेज कुचकामी ठरत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here