रिलायन्स सिमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड (बिर्ला कार्पो. ली) चे सामाजिक दायित्वाचे कामे करण्यास टाळटाळ.

0
356

रिलायन्स सिमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड (बिर्ला कार्पो. ली) चे सामाजिक दायित्वाचे कामे करण्यास टाळटाळ.

परिसरातील सरपंचांचा गंभीर आरोप, आठ दिवसांचा निवेदनातून अल्टिमेटम.

राजू तूरणकर–संपादक लोकवाणी जागर

रिलायंस सिमेंट प्रायव्हेट लिमिटेड( बिर्ला कार्पोरेशन) पिंपरवाडा मुकुटबण कपनी कार्यक्षेत्रातील सी. एम. आर. अतर्गत येत असलेले सर्व ग्रामंचायत सरपंच यांनी कंपनी, आमदार जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून सदर कंपनी सामाजिक दायित्व टाळत असल्याच्या गंभीर आरोप निवेदनातून केला आहे.(पंजीकरण अधिनियम एलएलपी द्वारा अधिनियम के तहत सांविधिक अपेक्षाओं की अनुपालन सुनिश्चित करने का महत्वपूर्ण कार्य सौंपा गया है।)

सदर कंपनी निसर्गातील साधन मालाचा वापर करून नफा कमवीत असते, त्याबदल्यात फरतफेड करण्याची सामाजिक जबाबदारी असावी म्हणुन सी एस आर (सोशियल वेल्फेअर फंड) निधीची तरतुद करण्यात आली आहे.तेव्हा एक सामाजिक जबाबदारी म्हणून या निधीतुन समाजोपयोगी कार्य करण्यात येते. तशी कंपनी संपदा ०३ कलम १३५ नुसार तरतुद आहे. म्हणुन आपल्या कपनीला सुद्धा सी. एस. आर. निधी खर्च करणे बंधनकारक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सामाजिक जबाबदारी म्हणजे समाजाप्रती असलेली जबाबदारी आपण समाजाला काही तरी देणं लागतो आणि समाजातील लोकांना फायदा होईल असे कार्य केले पाहीजे यामध्ये, मुख्यतः गावातीलरस्ते नाल्या, गरीब मुला मुलीसाठी शिक्षण, क्रिडा स्पर्धा साहित्य वाटप, पाणी, आरोग्य, स्वच्छतासाठी कामे करणे व सुशिक्षीत बेरोजगार साठी रोजगार अपेक्षीत आहे. परतु आपल्या कपनी मार्फत ही कामे होताना दिसत नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

मागील तिन वर्षापासुन आमच्या गावात सी एस आर मधुन तटपुंजे कामे करून आम्हाला गाजर दाखविण्याच आपण काम करीत आहे. आणि चालु असलेल्या कामामध्ये सुद्धा अनियमता आपल्या मार्फत होत आहे. मागील तिन वर्षापासुनचे २ टक्के आलेला निधी कोणत्या गावात किती निधी आपण खर्च केला गावानिहाय विवरण न देत्या आपण आपले कर्मचारी मुजोर बनून वागत आहेत. याचा सर्व हिशोब आठ दिवसात देण्यात यावा. आमच्या प्रत्येक गावातील असलेल्या सी.एस आर, निधीमध्ये होत आहे. आपल्या कंपनीम आमच्या क्षेत्रात विकासगंगा संस्था व आम्ही आमच्या आरोग्या साठी मागील काही महिण्या पासून काम करत आहे या संस्थे मार्फत सी.एस आर निधी खर्च केला जात आहे. तेव्हा या संस्थेने केलेल्या प्रत्येक महिन्याचा कामे व त्यावरील खर्चाचा हिशेब येत्या आठ दिवसात देण्याची मागणी कंपनीकडे केली परिसरातील सर्व सरपंच मीना आरमुरवार मुकुटबण, विनोद धोटे सरपंच येडशी, भास्कर सुर सरपंच अडेगाव, नयना खडसे सरपंच राजूर गो., महेंद्र आवते, पिंप्रड बे., अर्चना पाईलवार हीरापुर यांनी केली असून, यासंदर्भात निवेदनाच्या प्रती आमदार वणी विधानसभा, जिल्हाधिकारी  जिल्हाकार्यालय यवतमाळ, मुख्यकार्यकारी अधिकारी यवतमाळ, उपविभागीय अधिकारी पांढरकवडा, तहसिलदार तहसिल कार्यालय झरीजामणी,
गटविकास अधिकारी झरी यांना देवून अवगत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here