पिकविमा नुकसान भरपाई तकार निवारण बैठक लावण्याची विजय पिदुरकर यांची आग्रही मागणी.
नुकसानीच्या पटित शेतकऱ्यांना मिळणारी तोडगी रक्कम, विमा कंपनीकडे असलेले प्रलंबित प्रकरणे यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड असंतोष..
राजू तुराणकर — संपादक लोकवाणी जागर.
प्रधानमंत्री पिकविमा योजना खरीप हंगाम २०२३ मध्ये शासन व प्रशासनाच्या आवाहाना नुसार वणी तालुक्यातील २१८४१ शेतकऱ्यांनी कापुस, सोयाबिन, तुर पिकाकरीता शासनाच्या १ रु. मध्ये लैसर्गिक आपत्ती, महापुर, अतिवृष्टी, जलमय, अवकाळी पाऊस, किड आणि रोगा सारख्या प्रतीकुल परीस्थितीत, पावसातील खंडामुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकाऱ्यांना पिकविमा संरक्षण देणे वा सर्वसमावेशक पिकविमा या योजनेत शासन नियुक्त रिलायन्स जनरल इन्सुरंस क. लि. ५ मजला गोरेगांव पुर्व मुंबई ४०००६३ यांच्याकडे विमा काडला आहे. माहे जुलै आगस्ट मध्ये वर्धा, निर्गुडा, पैनगंगा, विदर्भ नदी काठावरील शेतपिके खरडुन व पाणी साचुन सडुन गेली सोबतच पावसातील खंडामुळे सोयाबिन विकावर आलेल्या येलोगोॉक व मुळकुण किड व आजारामुळे सोयाबीन पिवळे पडून वाळले या मध्ये शेतकऱ्यांनी जोकीमेच्या वाषीनुसार प्रतिकूल हवामान घटक, हंगामातील प्रतिकुल परीस्थिती झालेले नुकसान, पिक पेरणी पासुन काढनी पर्यंतच्या कालावधीत पिकाच्या उत्पादनात येणरी घट, स्थानिक नैसर्गीक आपत्ती काढनी पश्च्यात नुकसान, या बाबीनुसार पिक विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रारी केल्या परंतु कंपनीकडून अल्पमदत दिल्या जाते. पिकविमा संरक्षण नुसार ८ दिवसात सर्वे करुन १ महिन्यामध्ये पिकविमा नुकसान भरपाई देणे. बंधनकारक असतांना कंपनी आगस्ट, सप्टेंबर , ऑक्टोबर मधील तक्रारीला १ महिन्याचा वर कालावधी लोटला तरी तक्रार करणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्याच्या खात्यात कंपनीकडून अजुनही रक्कम जमा झाली नाही. शेतकऱ्यांचे पिकविमा नुकसान बाबत कृषी विभागाकडे सर्वे फार्म अजुनही कंपनीने जमा केले नाही. नायगांव बु. येथील शेतकऱ्यांनी गुंज नाला वर्धा व निर्गुडा नदी आलेल्या २६ व २७ जुलै पुरात वाहुन गेलेल्या पिकविमा धारक शेतकऱ्यांना नुकसानी प्रमाणे १००% नुकसान भरपाई देण्यात यावी असी न्याय व रास्त मागणी केली आहे. हीच अवस्था संपूर्ण वणी तालुक्याची असुन शेतकरी पिकविमा कंपनी तालुका प्रतिनीधी कडे चकरा मारुन परत जाते, त्यांनी पैसे का मिळाले नाही. याचे उत्तर मिळत नाही यामुळे शेतकऱ्यामध्ये असंतोष आहे. करीता आपण तालुक्यातील सर्व पिकविमा धारक शेतकऱ्यांना दिलासा होण्याच्या दृष्टीने तक्रार निवारण बैठक घेवुन शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून ही समस्या सोडवावी ही आग्रही भूमिका भाजपचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी तहसीलदार मार्फत जिल्हाधकारी यवतमाळ, कृषी विभाग आणी विमा कंपनीला केली आहे.