त्या गौ मातेला वाचविण्यासठी युवकांची धडपड.

0
306

माणुसकीचे दर्शन..!

त्या गौ मातेला वाचविण्यासाठी युवकांची धडपड…

राजू तुरणकर.

 

” मुक्या प्राण्यांना बोलता व सांगता येत नाही. याचा अर्थ त्यांना सुखदुःखाच्या काहीच भावना होत नाहीत, असा आहे का? नाही उलट त्यांना सर्व भावना असतात आणि आपल्या पेक्षा जास्त सवेंदनशिल असतात , मात्र ते बोलू शकत नसल्याने ते आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही.मात्र काही माणसे जीवन जगत असताना, फक्त माणसांनाच नाही तर इतर मुक्या प्राण्यांचे दुःख हेरून त्यांची सेवा करतात, आणि  आपण माणूस या स्वरूपात आपले आदर्श रूप दाखवून माणुसकी चे दर्शन घडवितात.

शहरात गौ माता, गौ तस्करी, गौ हत्या इत्यादी गोष्टी चालत असताना, काही युवक मात्र एका निराधार (कालवडी ची) गौ रक्षा करतोय असे सुखद अनुभव पहावयास मिळत आहे.

  1. शहरातील शास्त्री नगर भागात एक (कालवड) गौ माता बिमार अवस्थेत काही युवकांना आढळून आल्याने त्यांचे म्हनं हळहळले, आधी त्यांनी सदर कालवड कोणाचे आहे याची खात्री करून घेतली, मात्र त्या कालवडीच्या धण्याने त्या कालवडी ची देखभाल करण्यासाठी असमर्थता दर्शवली. त्यामुळे सदर युवकांनी एका हात गाडीतून, त्या कालवडी ला पशु रुग्णालयात उपचारासाठी नेले, व उपचार करून त्या (कालवड) गौ मातेला सुपूर्त केले व ‘मुक्या प्राण्यांना अभय’ हे संतांचे विचार प्रत्यक्षात उतरवून माणुसकीचे दर्शन दिले. यासाठी कुणाल ठोंबरे, अविनाश बोढे, शुभम कायरकर, भुषण चौधरी, ओम चौधरी, सोहोम टिकले, आदिल शेख, आदित्य राजुरकर, जगन बोढे, रोहीत ठोंबरे, फैयाज शेख व या परिसरातील युवकांची सातत्याने  धडपड सुरू आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश येवो अशी प्रार्थना सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here