सराटी येथे अवैद्य देशी दारू अड्ड्यावर पोलिसांची धाड.

0
354
  • सराटी येथे अवैध देशी दारू अड्ड्यावर धाड.
    विभागीय स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व मारेगाव पोलिसांची सयुक्त कारवाई. आरोपी सह मुद्देमाल जप्त.

आनंद नक्षणे–मारेगाव.

तालुक्यातील सराटी येथे अवैध देशी दारू विक्री सुरू असल्याचे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आज सकाळी सात वाजता विभागीय स्थानिक गुन्हे शाखा व मारेगाव पोलिसांनी अवैध देशी दारू अड्ड्यावर सयुक्त कारवाई करीत पन्नास हजाराच्या मुद्देमालासह आरोपीला अटक करण्यात आली आहे.

तालुक्यातील सराटी येथे अवैध देशी दारूचा साठा मध्यरात्री दाखल झाल्याची गोपनीय माहिती पोलिसांच्या हाती लागताच भल्या पहाटे पोलीस पथक सराटी येथील संशायित विवेक नरहरी नरांजे यांचे निवासी स्थानी धडकले. घराची झाडाझडती घेतली असता स्वयंपाक खोलीत अवैधरित्या ६७२ बॉटल्स भरलेले देशी दारूचे खोके आढळून आले.या कारवाईत किमान ४६७०५ चीं देशी दारू जप्त करीत , संशायित विवेक नरांजे यास अटक करण्यात आली. विभागीय स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरिक्षक अतुल मोहनकर यांच्या मार्गदर्शनात सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, सुनिल पिदूरकर, रजनीकांत मडावी, सतीश फुके, जमादार रजनीकांत पाटील, राजू टेकाम यांनी ही कारवाई केली.

मारेगाव तालुक्यातील अनेक गावात अवैध देशी दारू विक्रीचा व्यवसाय जोरकस आहे. तालुक्यातील बहुतांश गावात दुचाकी वाहनाने थेट मध्यरात्री मारेगाव, वणी व शिबला येथून देशी दारू पुरविण्यात येत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे अनेक तरुण व्यसनाधीन होवून, गैर कायदेशीर कृत करण्यास परावृत्त होत असल्याचे चित्र असून किंबहुना तालुक्यात यामुळे अनेक गावातील शांतता भंग होवून सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे.पोलिसांनी केलेल्या कारवाई मुळे गावात समाधान व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here