आज वणीत १०८ हनुमान चालीसा पठण व शिव महापुराण कथा नियोजन महासभेचे आयोजन.
वणी परिसरात प्रसिद्ध कथावाचक शिवभक्त प्रदीप मिश्रा सीहोर यांच्या शिवमहापुराण कथेची जय्यत तयारी सुरू. शिवमहापुरण कथा वाचक प्रदीप मिश्रा यांच्या फॉलोवर्स मध्ये प्रचंड उत्साह…
सर्व शिवभक्त आणि सेवा देणाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे राज जैस्वाल यांचे आवाहन…
राजू तुरनकर वणी
वणी परिसरातील परसोदा येथे भव्य दिव्य शिवमहापुराण कथा चे आयोजन करण्यात आले आहे. त्या दृ्टीकोनातून वणी शहर व परिसरात शिव भक्तांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. अती भव्य स्वरुपात हि शिवपुराण कथा होणार असल्याने, त्या अनुषंगाने शिस्तबध्द,व सु संस्कृत पध्दतीने जय्यत तयारी ही अंतिम टप्प्याकडे जात असून, या संदर्भात आज S B लॉन येथे 108 श्री हनुमान चालीसा पठण व सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, नवीन वर्षात 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी मध्ये सिहोर निवासी शिव जागृती करणारे पंडित श्री प्रदीप जी मिश्रा यांचे शिव महापूरान होणार असून या संदर्भात कमीत कमी 25 च्या वर वेगवेगळ्या समित्या स्थापन कराव्याच्या आहे, या संदर्भात सविस्तर चर्चा तसेच समितीचे गठन करण्याच्या उद्देशाने आज शनिवार रोज 16 डिसेंबर ला महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.
एस बी लॉन मध्ये होणाऱ्या या महासभेमध्ये सकाळी 11 ते 3 चा दरम्यान 108 वेळा हनुमान चालीसा पठण ने सुरवात होत असून , त्या नंतर लगेच महासभेला सुरवात होईल, या सभेमध्ये वेगवेगळ्या समिती चे गठन होणार आहे, करिता सर्व भक्तांनी आणि समाज सेवकांनी उपस्थित राहण्याची विनंती मुख्य आयोजक राजा जैस्वाल यांनी केले आहे.