उमेश बोढेकर चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा क्षेत्राच्या कामगार मोर्चा संयोजक पदी.
बोढेकर यांच्या नियुक्तीचे कामगार क्षेत्रात जल्लोषात स्वागत.
राजू तुराणकर– संपादक लोकवाणी जागर
उमेश बोढेकर यांची चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघाच्या कामगार मोर्चाच्या संयोजक पदी निवड करण्यात आली आहे. कामगार मंत्री सुरेश खाडे, विजय हरगुडे प्रदेशाध्यक्ष कामगार मोर्चा, जयदेव लकसडवार कामगार जिल्हा यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र देण्यात आले.
चंद्रपूर वणी, आर्णी या लोकसभा क्षेत्रामध्ये अनेक कामगारांनी आपली सरकार दरबारी नोंद केली आहे असे संघटीक, तसेच कामगार अजूनही असंघटित आहे. या सर्व कामगारांना संघटित करून त्यांना त्यांच्या समस्या मार्गी लावणे सरकार दरबारी न्याय मिळवून देण्याकरिता ही नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीमुळे कामगार क्षेत्रामध्ये प्रचंड आनंद व्यक्त करण्यात येत असून या निवडीचे सर्वांनी जोरदार स्वागत केलेआहे. या निवडीचे श्रेय माजी खासदार तथा ओबीसी महामंडळाचे केंद्रीय अध्यक्ष हंसराज अहिर , वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांना देत आहे.
उमेश बोढेकर हे ट्रान्सपोर्ट व्यवसायिक असून अनेक वर्षापासून कामगार मोर्चाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पद त्यांनी भूषविले आहे, त्यांनी पदावर असताना हजारो कामगारांना संघटित करून त्यांना न्याय मिळवून दिला आहे, जनसामान्यांचा तळागाळातील कार्यकर्ता व हाकेला धावून जाणारा अशी त्यांची ओळख असल्याने, त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना या पदावर बढती देण्यात आली आहे.