श्री धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वणी र. नं. ११६२ च्या अध्यक्षपदी सिमा विजय चोरडिया यांची बिनविरोध निवड.
संस्थेला प्रगतीपथावर नेणार–सीमा विजय चोरडिया.
राजू तुरणकर–संपादक लोकवाणी जागर.
वणी शहरातील नामांकित श्री. धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वणी र. न.1162 चे अध्यक्ष आरती संजय चौधरी यांनी व्यक्तिगत कारण सांगून राजीनामा दिल्याने, रिक्त झालेल्या जागेवर सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय वणी यांच्या आदेशाने एस डी मडावी सहायक सहकार अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. त्यामध्ये सीमा विजय चोरडिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी आरती संजय चौधरी यांनी आपल्या कार्यकाळातील अनुभव कथन करीत भावना व्यक्त करतांना नवनियुक्त अध्यक्ष सीमा चोरडिया यांना शुभेच्छा दिल्या.
नवनियुक्त अध्यक्षा सीमा विजय चोरडिया
आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकत जी जबाबदारी दिली, त्यामध्ये निश्चितच मी बँकेला प्रगती पथावर नेत बँकेच्या माध्यमातून तळागाळातील लोकांना बचतीची सवय लावून, कर्ज स्वरूपात गरजवंताना कर्ज उपलब्ध करून जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी विजय चोरडिया यांनी सर्व महिला संचालकांचे आभार मानत संस्थेला प्रगतीपदावर नेण्याची हमी दिली.
यावेळी आरती संजय चौधरी, पूजा जगणं जुनगरी, वंदना प्रवीण राजूरकर, पल्लवी प्रशांत उदापूरकर, ताई कवडूजी मुठावार, सरोज संतोष कोनप्रतीवार, संगीता अनिल खुंगर, मंजू अनिल बिलोरिया, सविता अरविंद राऊत, गीता राजू तुरणकर, शुषमा राजू येवले, सोनू राजेंद्र मदान या महिला संचालिका उपस्थित होत्या. सर्वांनी एकमुखाने बिनविरोध निवड करीत अभिनंदन केले.
एस डी मडावी सहायक सहकार अधिकारी यांचे स्वागत अतुल मुठ्ठावार यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू तुरणकर यांनी केले.