क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने वणीत सप्त तारका विक्री प्रदर्शनी.

0
521

क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांची जयंती निमित्ताने सप्ततारका विक्री प्रदर्शनी.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष नेते राजुभाऊ उंबरकर यांच्या संकल्पनेतुन मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक शिंदे 2 जानेवारीला वणीत.

राजू तुरणकर-संपादक लोकवाणी जागर

प्रथम महिला शिक्षिका समाज क्रांतीकारक स्त्रियांसाठी शिक्षणाचे दारे उघडे करून तमाम स्त्री जातीचा उद्धार करणाऱ्या ज्ञानज्योती, क्रांतिज्योती सावित्री बाई फुले. यांच्या जयंती निमित्ताने “एकच ध्येय हात माझा मदतीचा”  विद्यमाने सप्ततारका विक्री प्रदर्शनी महिला उद्योजिका मेळावा १ जानेवारी ते ३ जानेवारी २०२४ प्रदर्शनाचे आयोजन एस बी लॉन वणी येथे आयोजित करण्यात आले आहे. तृप्ती राजुभाऊ उंबरकर यांच्या हस्ते 1 जानेवारीला या प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष संगिता संजय खाडे अध्यक्ष, श्री. लक्ष्मीनारायण नागरी सह. पतसंस्था, वणी प्रमुख पाहुण्या ललीता ताई संजीवरेड्डी बोदकुलवार, किरण संजय देरकर अध्यक्ष, एकविरा पतसंस्था मारेगांव, डॉ. प्रिती महेंद्र लोढा, डॉ. संचिता विजय नगराळे उपस्थित राहणार आहेत.

मनसे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतुन मराठी सिनेसृष्टीतील अनेक चित्रपटातुन अल्का कुबल यांच्या सोबत मराठी सिनेसृस्टी गाजवनारे सिरीयल मधुन आपली भूमिका साकारनारे अभिनेते अशोकजी शिंदे  २ जानेवारीला सप्त तारका विक्री प्रदर्शनीला भेट देणार आहे.

बुधवार, दि. ३ जाने.दुपारी ४.०० वा.मुलींची एकलनृत्य स्पर्धा (वयोगट ४ ते १०, ११ ते २०) महिलांकरिता (खुली नृत्य स्पर्धा) आयोजित करण्यात आलेली आहे त्याकरिता प्रवेश फी  १००/-रु. ठेवण्यात आली असून या स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिला स्पर्धकांनी आपल्या नावाची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवार, दि. १ जाने. दुपारी ४.०० वा. महिलांकरता भजन स्पर्धा आयोजित केलेले आहे(६ चा ग्रुप) भजन मंडळाला त्यांच्या आवडीनुसार भजन म्हणायचे आहे तरी इच्छुक महिला भजन मंडळींनी “एकच ध्येय हात माझा मदतीचा” बहुउद्देशिय संस्था वणीच्या अध्यक्ष तथा मनसे महिला जिल्हा अध्यक्ष अर्चना बोदाडकर 8788680965,  वंदना आवारी काँग्रेस महिला जिल्हा अध्यक्ष 9422922080, साधना गोहोकार माजी नगराध्यक्ष, 9657020487, गितांजली माथनकर 79729913 83,  मिनाक्षी देरकर 9404142016,  कविता चटकी 9823661505, अश्वीनी पारखी 9130153501 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मराठी सिनेसृष्टीतील अनेक चित्रपटातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे प्रसिद्ध अभिनेते अशोक शिंदे २ जानेवारी २०२४ ला वणी शहरातील एस. बी. लॉन येथे आयोजित सप्ततारका विक्री प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here