एक अवैध रेती हायावा जप्त, मारेगाव महसूलची कारवाई.

0
116

मारेगाव मार्डी रोड च्या मार्गी केला चोरट्या रेतीचा हायवा जप्त.
काल मध्यरात्री ची कारवाई.

मारेगाव : चोरट्या मार्गाने रेती तस्करांचा उच्छाद कायम असून महसूल विभाग रात्रीला गस्तीवर असतांना भालेवाडी येथे काल मध्यरात्री अवैध रेती चा एक हायवा ताब्यात घेतला, ह्या धडक कारवाई मुळे रेती तस्करात चांगलीच धडकी भरली आहे.

मारेगाव तालुक्यातील रेती तस्कर वर्धा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी करण्यात माहीर असल्याचे बोलले जात आहे. किंबहुना बुधवारच्या मध्यरात्री ट्रॅक्टर,हायवा वाहनाने हे गोरखधंदे करीत असल्याने सातत्याने महसूल विभाग त्यांच्या कायम मागावर आहे. दरम्यान, मध्यरात्री तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या मार्गदर्शनात महसूल पथक रेती तस्करांच्या मागावर असतांना रेती भरलेला हायवा मार्डी ते मारेगाव मार्गाने रेती भरून येणारा हायवा (MH-34 AV 0079) हे अवैध वाहन भालेवाडी येथे पकडण्यात आला. पंचनामा करून दंडात्मक कारवाई साठी ताब्यात घेतलेला हायवा तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्याची माहिती आहे. ही कार्यवाही तहसीलदार निलावाड यांचे मार्गदर्शनात तलाठी एस सी कुडमेथे व तलाठी व्ही बी सोयाम यांनी केली.

परिणामी, रेती तस्करांच्या दिवसागणिक मुजोऱ्या वाढून प्रशासनाला तुरी देण्याचे षडयंत्र नित्याचेच झाले असून सातत्याने महसूल विभाग ऍक्शन मोडवर येत रेती तस्करांचे मनसूबे हाणूण पाडण्यासाठी पारदर्शक अधिकारी तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल सातत्याने प्रयत्नशील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here