मारेगाव तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळत नसल्यामुळे शिवसेना रस्त्यावर.
तहसीलदार मारेगाव यांचे अडेलतट्टू धोरण.
आनंद नक्षणे – मारेगाव.
मारेगाव तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना मागील वर्षापासून रेती मिळत नसल्याने शिवसेना मागील महिन्या पासून आक्रमक झाली आहे. निवेदन देऊन यासंदर्भात तहसीलदारांना अवगत केले होते. मात्र महिन्याभराचा कालावधी उलटूनही घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती देण्यास सुरुवात न केल्याने, आज मारेगावात चक्का जाम आंदोलन विशाल किन्हेकर यांचे नेतृत्वात दुपारी 1 वाजता करण्यात येणार आहे.
घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करून देण्याचा शासनाच्या महत्त्वकांक्षी निर्णयाला मारेगाव येथील तहसीलदार छेद देत असून शासनाची बदनामी करत असल्याचा आरोप शिवसेनेचे मारेगाव तालुका प्रमुख विशाल किन्हेकर यांनी केला आहे.
तरी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व घरकुल लाभार्थ्यांनी व इतरही कामासाठी रेती लागणाऱ्यांनी या चक्का जाम आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन विशाल किन्हेकर यांनी केले आहे.