तहसीलदार मारेगाव यांची अवैध रेती तस्करांवर करडी नजर, लागोपाठ कारवाईने अवैध रेती तस्करीवर आळा बसणार.
आनंद नक्षणे – मारेगाव तालुक्यातील गदाजी (बोरी) येथून रेतीचे उत्खनन करून अवैधरित्या वाहतूक करताना महसूल विभागाने नुकतेच एका ट्रक ला दंडात्मक कारवाई साठी ताब्यात घेतले असून ही कारवाई (मंगळवारी) महादापेठ गावाजवळ तहसीलदारांसह महसूल पथकांनी केली.
तालुक्यात अवैध उत्खनन करून तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी महसूल विभागाने कंबर कसली आहे. तहसीलदार निलावाड यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाचे पथक तथा नायब तहसीलदार गदाजी बोरी परिसरात गुप्त माहिती च्या आधाराखाली दबा धरून बसले होते. अशातच गदाजी बोरी येथून अवैध रेतीचे उत्खनन करून पोबारा करीत असताना तहसीलदार, नायब तहसीलदार व महसूल पथक यांनी ट्रक चा पाठलाग करून आज दि.6 फेब्रुवारी ला सायंकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान महादापेठ येथे पकडून त्या ट्रक वर कारवाई करण्यात आली.
तालुक्यातील वर्धा नदी घाटावर गेल्या अनेक वर्षापासून रेती तस्करांच्या नजरा खीळल्या आहे. यात अनेकांनी चांगलीच माया गोळा केली. मात्र, मागील काही दिवसापासून महसूल विभाग अॅक्शन मोडवर आल्याने सतत कारवाईचा बडगा उगारत असताना मालामाल झालेले तस्कर तहसीलदार यांच्या कारवाई ने चांगलेच धास्तावले आहे.
तहसीलदार उत्तम निलावाड निर्भीडपणे तस्करांचे कंबरडे मोडण्यासाठी कटिबद्ध असताना आज महादापेठ येथे एक ट्रक क्र. (एम एच 36 1675) हे वाहन अवैधरीत्या वाळू उत्खनन करून वाहतूक करीत असल्याचे आढळले. दरम्यान,त्या ट्रक वर जप्ती ची कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई तहसीलदार उत्तम निलावाड, नायब तहसीलदार भगत, रघुनाथ कांडाळकर मंडळ अधिकारी आणि विजय कनाके वाहन चालक हे उपस्थित होते.